Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

पंचमसाली आंदोलनात पोलिसांकडून बॅनर जप्त

  बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. लाठीचार्जच्या फोटोंसह बॅनर लावल्याने पोलिसांनी तो जप्त केला. यामुळे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानात पुन्हा एकदा हायड्रामा पाहायला मिळाला. सुवर्ण सौध परिसरात झालेल्या लाठीचार्जचे …

Read More »

हुक्केरीतील चोरी प्रकरणांचा दोन दिवसांत लावला छडा

    हुक्केरी : हुक्केरी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात हुक्केरी पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांना यश आले आहे. शहरातील बुद्ध बसव आंबेडकर सहकारी संस्था व किराणा दुकानात झालेल्या चोरी प्रकारचा छडा ४८ तासांत लावून आरोपीला पकडून हुक्केरी न्यायालयाच्या ताब्यात दिले. बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमा शंकर …

Read More »

७०% गुडघेदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही

  बेळगाव : मानवी शरीरातील सांध्याची प्रतिबंधात्मक काळजी व त्यावरील अत्याधुनिक उपचार या विषयी दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या टीम मधील डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी वरेरकर नाट्य गृहामधील कार्यक्रमात उपस्थितना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. जगदीश कुंटे …

Read More »

मणतूर्गा येथील रवळनाथ मंदिराचा कळस बांधकाम समारंभ

  खानापूर : मणतूर्गा येथे सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वतनदार नारायण महादेव पाटील हे होते. रवळनाथ पूजन श्री रवळनाथ जीर्णोद्धार समिती सदस्य नामदेव गुंडू गुरव पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले तर मंदिराचा कळस बांधकाम शुभारंभ उद्योजक व माजी अध्यक्ष श्री …

Read More »

घटप्रभा रेल्वे स्थानकाला वंदे भारत थांबा : खासदार इरण्णा कडाडींच्या मागणीला यश

  बेळगाव : हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबवण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचे खासदार इरण्णा कडाडी यांनी सांगितले आहे. राज्यसभेचे खासदार इरण्णा कडाडी यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबा …

Read More »

उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

  नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विरोधी …

Read More »

नेसरीत 19 वे जटानिर्मूलन; नेसरी व गडहिंग्लज शाखा अंनिसचा पुढाकार

  नेसरी : येथे महाराष्ट्र अनिस नेसरी व गडहिंग्लज शाखेच्या पुढाकाराने आणि नेसरी वाचन मंदिर व पत्रकार संघाच्यावतीने येथील विवाहित महिला प्रियांका समीर सुतार, (वय 30) यांच्या डोक्यावरील जटा काढण्यात आल्या. अनिसचे राज्याचे सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे, पांडुरंग करंबळकर गुरुजी, अशोक मोहिते आदिनी कात्री चालवून प्रियांका यांच्या …

Read More »

लिंगायत पंचमसाली आंदोलनकर्त्यांवर लाठीमार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

  बसवजय मृत्युंजय स्वामीजी बेळगाव : लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या घटनेचा निषेध करत श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे अनिश्चितकाळासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ आणि लिंगायत समाजाचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागावी, या मागणीसाठी श्री …

Read More »

ख्रिसमसचा संयुक्तिक कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात

  बेळगाव : बेळगाव शहरात नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू असताना येथील मेथोडिस्ट चर्चच्या आवारात कमिशन फॉर इक्यूमेनिझम आणि सेंट्रल मेथोडिस्ट चर्च, बेळगाव यांच्या सहकार्याने ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्सद्वारे आयोजीत संयुक्तिक ख्रिसमस कार्यक्रम शहरातील विविध चर्चच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिकतेने उत्साहात पार …

Read More »

बेळगावात विविध मागण्यांसाठी अभाविपचे आंदोलन

  बेळगाव : विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, शिष्यवृत्तीच्या वितरणात होणारा भेदभाव थांबवावा आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिक बस सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्यांसाठी आज बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) वतीने आंदोलन करण्यात आले. आज बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या …

Read More »