Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या समस्यांबबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा

  निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रातील कारखान्या प्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी दर …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी महत्वपूर्ण बैठक

  खानापूर : १ नोव्हेंबर काळ्या दिनासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेंव्हापासून १ नोव्हेंबर हा संपूर्ण …

Read More »

मुडा घोटाळा : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची उच्च न्यायालयात याचिका

  राज्यपालांच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठात याचिका दाखल करून म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणाशी संबंधित खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात चौकशीला परवानगी दिली होती. सिद्धरामय्या …

Read More »

बेलेकेरी खनिज प्रकरण : कारवारचे काँग्रेस आमदार सतीश सैल दोषी

सीबीआय अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात बंगळूर : कारवारमधील काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांना बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश देऊन सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सैल यांना न्यायालयाच्या आवारात ताब्यात घेतले आहे. ११,३१२ मेट्रिक टन जप्त खनिजाची परवानगी न घेता वाहतूक …

Read More »

काँग्रेसची ४८ जणांची पहिली यादी जाहीर

  मुंबई : महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने नागपूर, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र यातील मतदारसंघांसह एकूण ४८ जागा जाहीर केल्या आहेत. आमचं ८५-८५-८५ जागांचं ठरलं आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. …

Read More »

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

  मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे म्हणाले. इस्लामपूरमधून …

Read More »

कुरिहाळ येथून बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी, हंदिगनुर, चलुवेनट्टी आणि अगसगा या गावासाठी सकाळी 7:30 वाजता परिवहन बस सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सदर गावातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बससेवेच्या मागणीसाठी कुरिहाळ, बोडकनट्टी हंदिगनुर, चलुवेनट्टी आणि अगसगा गावातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आज गुरुवारी सकाळी ॲड. एन. आर. लातूर यांच्या …

Read More »

दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार कोसळला दरीत

  बेळगाव : दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार खोल दरीत पडून अपघात झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात घडली आहे. मात्र या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे. सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवस्थान परिसरात हा अपघात घडला. सौंदत्तीहुन यल्लम्मा देवस्थानाकडे जात असताना दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकीसहित …

Read More »

बेळगाव महापालिकेकडून कर वसुली मोहिमेला सुरुवात

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज फिल्डवर उतरून कर वसुली मोहिमेला सुरुवात केली. शहरातील बाजारपेठ परिसरात करवसुली मोहीम राबवत प्रचंड कर थकबाकी असलेल्या दुकानांना टाळे ठोकून जप्तीची कारवाई करण्यात आली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार बेळगाव महापालिकेनेही करवसुली मोहीम सुरू केली आहे. बेळगावच्या जनतेने थकीत कर …

Read More »

काळ्या दिनाला परवानगी देऊ नये : कन्नड संघटनांची कोल्हेकुई

  बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनासाठी कोणत्याही कारणास्तव परवानगी देऊ नये अशी मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. आज बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत कन्नड संघटनांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या …

Read More »