Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्स ग्रुप मेनच्या वतीने बक्षीस वितरण

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात जायंटस विकचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये किल्ला येथील आराधना दिव्यांग स्कूलच्या विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा बक्षिस वितरण कार्यक्रम जायंट्स भवनच्या सभागृहात विजेत्याना पाहूण्यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. व्यासपिठावर …

Read More »

राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी

  शिवस्वराज संघटनेचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन बेळगाव : राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवस्वराज संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले आहे. बेळगाव ते अनमोड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन अनेक वर्षे उलटली आहेत. तसेच बेळगाव ते …

Read More »

‘गणेश दूध’च्या उपपदार्थांना ‘अन्न व औषध’तर्फे प्रमाणपत्र

  बेळगाव : गणेश दूध संकलन केंद्रातर्फे उत्पादित होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची अन्न व औषध विभागातर्फे तपासणी करुन गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी गणेश दूध संकलन केंद्राचे चालक उमेश ऊर्फ प्रवीण देसाई म्हणाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची प्रक्रिया, पॅकेजिंग, स्वच्छता आदींची अन्न व औषध निरीक्षक कंकणवाडी यांनी पाहणी केली. सध्या …

Read More »

लक्ष्मीटेकजवळ जलवाहिनी फुटून पाणी वाया

  बेळगाव : शहरात सध्या झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर दुसरीकडे लक्ष्मी टेक येथील जलवाहिनी फुटून पाणी पाण्याचे लोंढे रस्त्यावर वाहताना दिसत आहे. सकाळच्या वेळी शहराकडे येणाऱ्या नागरिकांना या पाण्याच्या लोंढ्यांमधून वाट काढत वाहने घेऊन यावी लागत होती. पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असूनही एल अँड टी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बोगस बीपीएल रेशनकार्डधारक

  बेळगांव : ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाखांच्या आत आहे, अशी कुटुंबे बीपीएल कार्डसाठी पात्र आहेत. परंतु, सरकारी सुविधा आणि बाकीच्या फायद्यांसाठी ज्यांच्याकडे बंगला, गाडी व वार्षिक उत्पन्न ८ ते १० लाखांवर आहे, अशा व्यक्तीही बीपीएल कार्ड घेतल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात २२ हजारांवर बोगस बीपीएल …

Read More »

योगेश्वर यांचा भाजपला रामराम, काँग्रेस पक्षात प्रवेश

  चन्नपट्टणमधून उमेदवारी शक्य; धजदच्या उमेदवारीची भाजपची ऑफर फेटाळली बंगळूर : एका नाट्यमय घडामोडीमध्ये, भाजप नेते आणि माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी बुधवारी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांना १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चन्नापट्टणमधून कॉंग्रेसची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनासाठी बराक ओबामाना निमंत्रण

  शताब्दी समितीच्या बैठकीत निर्णय, बेळगावातील कॉंग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम बंगळूर : डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्याचा विचार आहे. बेळगावात महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, शताब्दी समितीचे अध्यक्ष कायदा, संसदीय कार्य …

Read More »

ऊस उत्पादकांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावून या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या जिल्हाधिकारी, साखर आयुक्त व अधिकाऱ्यांच्या धोरणाचा निषेध करत निजलिंगप्पा शुगर कंपनी येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ऊस उत्पादकांनी आंदोलन केले. बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली. मात्र, जिल्हाधिकारी …

Read More »

हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव संपन्न

  बेळगाव : हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. यावेळी श्री. व्ही. बी. उन्नी परिवाराकडून देण्यात आलेल्या 3 लाख 75 हजार रुपये देणगीतून श्री बाळूमामांची चांदीची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली होती. जयंती उत्सवानिमित्त सदर मूर्तीची मिरवणूक श्री बाळ्या स्वामी मठापासून करण्यात …

Read More »

येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे समाजसेवकांनीच बुजवले

  बेळगाव : रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दखल घेत नसल्यामुळे शेवटी गेल्या सोमवारी सुळगा (येळ्ळूर) गावातील सामाजिक कार्यकर्त्यांवर येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजवण्याची वेळ आली. येळ्ळूर (सु.) ते राजहंसगड हा रस्ता देसुर ते नंदीहळ्ळी रस्त्याला जोडला गेल्याने तो पुढे नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी तसेच …

Read More »