Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

ईडीचा मुडा कार्यालयात ३० तास तपास

  समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची माहिती बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) संदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चौकशी करत आहे. एजन्सीने मुडा कार्यालयात जवळपास ३० तासांची व्यापक झडती घेतली. म्हैसूरमधील मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यादरम्यान सुरक्षा …

Read More »

दोन कोटी फसवणुक प्रकरण : वाटाघाटीनंतर जोशींच्या भावाविरुध्दचे प्रकरण घेतले मागे

  बंगळूर : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ गोपाळ जोशी, बहीण विजयालक्ष्मी आणि गोपाळ यांचा मुलगा अजय यांच्या विरोधात दोन कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल करणाऱ्या सुनीता चव्हाण (वय ४८) यांनी अखेर तडजोडीनंतर दाखल केलेला गुन्हा मागे घेतल्याचे कळते. धजदचे माजी आमदार देवानंद फुलसिंग चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत काळा दिन गांभीर्याने पाळू; विभागवार जनजागृती करावी

  बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : मराठी सीमाभाग अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी तात्कालीन म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे गेल्या ६७ वर्षापासून काळा दिन सुतक दिन म्हणून पाळला जातो. येत्या एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्या दिनाची विभागवार जनजागृती करावी असा निर्णय बेळगाव तालुका म. …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 जणांची पहिली यादी जाहीर

  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज अखेर आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 99 उमेदवारांची नावे आहेत. फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, मागील निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. यादी …

Read More »

मराठी भाषा ही प्राचीन असून ती समृद्ध आहे : रणजीत चौगुले

  येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी, बालगणेश उत्सव मंडळ व नवरात्री उत्सव महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व पाठपुरावा समितीचे सदस्य या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी …

Read More »

सांबरा विमानतळ उडवण्याची धमकी

  बेळगाव : बेळगाव येथील सांबरा विमानतळाला धमकीचा ई मेल आल्याने खळबळ माजली होती. पोलिसांना याची माहिती विमानतळ प्रशासनाने देताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस विमानतळावर दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली. या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. पोलिसांनी विमानतळाच्या बाहेरील परिसराची …

Read More »

मर्कंटाईल सोसायटीच्या वतीने कौतुक संध्या संपन्न

  बेळगाव : “विद्यार्थी मित्रांनी आयुष्यात जे व्हायचे आहे ते निश्चित ठरविण्याबरोबरच कष्ट उपसण्याची जिद्द, चिकाटी ठेवावी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य व चांगली नीतिमत्ता ठेवावी म्हणजे त्यांना आयुष्यात हवे ते आत्मसात करता येईल” असे विचार मंगेश होंडाचे मॅनेजिंग डायरेक्टर रोहित देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केले. मर्कंटाईल को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने …

Read More »

‘गणेश दूध’चा दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा

  बेळगाव : मोतीराम देसाई हे गावात दूध संकलन करत असताना या व्यवसायात उमेश देसाई यांनी लक्ष घातल्यानंतर ऊर्जितावस्था आली. वडिलांना मदत व्हावी म्हणून उमेश यांनी लक्ष घालताच हा व्यवसाय नावारुपाला आणला. नैसर्गिक चवीमुळे उपपदार्थांना मागणी वाढली आहे. उमेश यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमांनाही भरीव मदत केली आहे, असे प्रतिपादन …

Read More »

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात 274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर व 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील सर्व क्षेत्रीय …

Read More »

एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आहार दिवस साजरा

  बेळगाव : येथील एसबीसी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीने जागतिक आहार दिन आणि 9व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर् फूड फेस्ट “स्वादोत्सव-2024” आयोजित केला आहे, ज्याची थीम “जीवनशैली विकारांसाठी उपचारात्मक आहार” आहे. खाद्य महोत्सवाचे उद्घाटन के एल ई आयुर्वेदिक कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संजीव टोनी यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »