Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

दसरा उत्सवासाठी बेंगळुरू-बेळगाव स्पेशल ट्रेन

  बेंगळुरू : दसरा उत्सवाची पार्श्वभूमी दक्षिण पश्चिम रेल्वेने बंगळुरू, म्हैसूर, हुबळी, बेळगाव या मार्गावर ४ विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती दिली आहे. सध्याच्या वीकेंडमध्ये दसरा सणासाठी अनेक लोक बंगळुरूहून वेगवेगळ्या शहरात जातात. प्रवाशांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतपूर-बेळगाव एक्सप्रेस गाडी …

Read More »

नवहिंद सोसायटीच्या वतीने डेप्युटी रजिस्ट्रार रवींद्र पाटील यांचा सत्कार

  येळ्ळूर : सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संचलित नवहिंद को ऑप. क्रेडीट सोसायटी लि; येळ्ळूरतर्फे बेळगांव जिल्हा सहकार खात्याच्या डेप्युटी रजिस्ट्रारपदी बढती मिळाल्याबद्दल रविंद्र पारसगौडा पाटील यांचा नवहिंद भवनच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रकाश अष्टेकर होते. व्यासपिठावर नवहिंद …

Read More »

साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षकांसाठी व्याख्यानाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यातर्फे आज मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी प्राध्यापिका संध्या चौगुले, सातारा यांचे “शिक्षकांसाठी शिक्षणातील बदलते प्रवाह व शैक्षणिक नवोपक्रम” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापिका संध्या चौगुले यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री. सुभाष …

Read More »

पहिले, दुसरे रेल्वे गेट तसेच तानाजी गल्ली येथे होणार रेल्वे उड्डाणपूल

  बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी शहरातील विविध रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामासंदर्भात अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन रेल्वे विभागाचे अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून आगामी काळात टिळकवाडीतील पहिले व दुसरे रेल्वे गेट तसेच तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट येथे उड्डाणपूल …

Read More »

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जगातील सर्वात प्रतिष्ठेचा ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडला. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती. हा कार्यक्रम विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना सन्मानित केलं. यंदाचा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब …

Read More »

संतप्त शेतकऱ्यांनी हलगा-मच्छे बायपासचे कामकाज बंद पाडले

  बेळगाव : शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा एकदा हलगा-मच्छे बायपासचे कामकाज आज सुरु करण्यात आले. दरम्यान आजपासून सुरु होणारे या कामाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच कळाली होती. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सुरू करण्यात आलेल्या कामाला विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे. अलारवाड क्रॉसजवळ हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी …

Read More »

कर्नाटक राज्यात राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी लवकरच जाहीर : प्रकाश मोरे

  बेळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीदरम्यान चर्चेवेळी कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून पक्ष बांधणी बळकट करण्यासाठी भेटीदरम्यान चर्चा झाली असून लवकरच कर्नाटक राज्यात पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी करण्यात येईल असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश …

Read More »

काळ्यादिनाला परवानगी दिली जाणार नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या दिवशी कोणत्याही कारणास्तव काळा दिवस साजरा करू दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्व तयारी बैठकीत बोलताना दिली. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी म्हणजे …

Read More »

सहाव्या दिवशी वडगाव परिसरात श्रीदुर्गामाता दौड उत्साहात

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्र उत्सवात होणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीच्या सहाव्या दिवशीची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग येथील दुर्गा देवी मंदिरात दुर्गा मातेच्या आरतीने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्येष्ठ धारकरी शंकर दादा भातकांडे यांच्या हस्ते ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही …

Read More »

कोगनोळी आरटीओवर लोकायुक्ताची धाड

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी आरटीओ ऑफिस वर लोकायुक्त यांच्यावतीने धाड टाकून कागदपत्रासह इतर तपासणी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, वाहन चालक व वाहन मालक यांनी कोगनोळी आरटीओ ऑफिस वर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत …

Read More »