Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

रामदेव गल्ली वडगाव येथे मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम

  बेळगाव : रामदेव गल्ली, माधवपूर -वडगाव येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केल्या जाणाऱ्या श्री हनुमान, श्री नागदेवता, श्री शिवलिंग व नंदी या मूर्तींची स्वाद्य मिरवणूक बुधवारी वडगाव परिसरात काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत अनेक पुरुष व मंगल कलश घेऊन सुहासिनी महिला सहभागी …

Read More »

कर्जदारांकडून होणारा छळ टाळण्यासाठी महिला स्वयंसहाय्य संघातर्फे निवेदन

  बेळगाव : फायनान्समधून कर्ज घेतलेल्या स्वयंसहाय्यता संघटनेच्या महिलांना कर्जदारांकडून त्रास दिला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गोकाक तालुक्यातील सावलगी गावातील महिलांनि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. गोकाक तालुक्यातील सावलगी गावातील स्वयंसहाय्यता संस्थेच्या महिलांनी आर्थिक छळ होत असल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले. बचत संस्थांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी …

Read More »

बेळगाव महानगरपालिकेची 27 ऑगस्ट रोजी तातडीची बैठक

  बेळगाव : बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात जमीन गमावलेल्या बाधितांना कोट्यावधींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिल्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात नुकसान झालेल्या जमीन मालकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बजावले आहेत. …

Read More »

इस्कॉन आयोजित कृष्ण कथा महोत्सव

  बेळगाव : “कलियुगात लोक संकुचित वृत्तीने अफवा पसरवितात तशीच अफवा पसरवून द्वापरयुगातही लोकांनी भगवंतांना सोडले नाही.” अशी माहिती इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बुधवारी सायंकाळी बोलताना दिली. इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्ण कथा महोत्सवातील दुसऱ्या दिवशी त्यांनी सतराजित राजा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये स्यमंतक मनीमुळे …

Read More »

कॅपिटल वन संस्थेला ३२.१८ लाख रुपयांचा नफा, सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर

  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे नुकतीच पार पडली संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दि. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेने सुमारे २० कोटी २१ लाख रुपयांच्या ठेवी १५५. ०२ कोटी रुपयांचे खेळते भांडवल …

Read More »

शहापूर येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

  बेळगाव : शहापूर येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. कल्पना शंकर पाटील (वय ५१, रा. बसवण गल्ली, शहापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. कल्पना या दम्याच्या आजाराने त्रस्त होत्या. यामुळे त्यांची मानसिक स्थिती …

Read More »

बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई करा : बेळगावात भाजपाची निदर्शने

  बेळगाव : राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याचे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक करून कारवाई करण्यात यावी आणि मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज बेळगावात भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गुरुवारी बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात छेडलेल्या आंदोलनात धरणे धरले. काँग्रेसने स्वतः चोरी करून आता …

Read More »

मला अटक करण्यासाठी शंभर सिद्धरामय्या जन्माला यावे लागतील; कुमारस्वामींचा आक्रोश

  एसआयटीच्या अहवालात कृष्णा, धरम सिंहांचीही नावे बंगळूर : गरज पडल्यास केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अटक करू, या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुमारस्वामी यांनी, मला अटक करण्यासाठी शंभर सिद्धरामय्या जन्माला यावे लागतील, असा पलटवार केला. श्री साई व्यंकटेश्वर मिनरल्स कंपनीला खाणकामाचे बेकायदेशीर कंत्राट दिल्याप्रकरणी आरोपपत्र …

Read More »

शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे लढून “देशासाठी गोल्ड मेडल मिळवणारच!” : ऑलिम्पिक नेमबाज स्वप्निल कुसाळे

ऑलिम्पिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ चांदीची गदा व मानपत्र देऊन दसरा चौकात भव्य सत्कार कोल्हापूर : शिव, शाहूंच्या या महाराष्ट्राच्या मातीत जे घडतात ते देशाचं नाव गाजवतातच! शिवाजी महाराजांचे मावळे जसे महाराजांसाठी लढत असत त्याचप्रमाणे खेळात उत्तम कामगिरी करुन कोल्हापूरचे आणि आपल्या …

Read More »

ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत

हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टीने वेधून घेतले लक्ष विद्यार्थी, युवा, अबालवृद्धांसह कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत …

Read More »