Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

वडगाव श्री मंगाई जत्रेत पशुबळी बंद करा…

  बेळगाव : जागतिक प्राणी कल्याण मंडळ व पशुबळी निर्मूलन जागृती महासंघ, बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी कर्नाटक सरकार, बेळगाव जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाला आवाहन केले आहे की, बेळगाव वडगाव श्री मंगाई देवीच्या जत्रेत पशुबळी रोखण्याचे आवाहन केले आहे. 30 जुलै रोजी बेळगावात वडगाव ग्रामदैवत श्री …

Read More »

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

  कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्य मार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 63 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग …

Read More »

दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी; दोन मुलींसह तिघांचा मृत्यू

  नवी दिल्ली : दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याकारणाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत जुने राजेंद्र नगर भागातही ठिकठिकाणी पाणी साचले. हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते. दिल्ली …

Read More »

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार

  नवी दिल्ली : महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने निपाणीतील ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कुर्ली व सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी शाळांमध्ये वाटप केले. मराठी शाळा व भाषा वाचविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी …

Read More »

वाल्मिकी घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या घरात सापडले १० किलो सोने

  बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळाचे कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्याचा तपास तीव्र करणाऱ्या सीआयडी आणि एसआयटीच्या तपास पथकाने मुख्य आरोपी सत्यनारायण वर्माच्या घरात लपवून ठेवलेली १० किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. तसेच हैदराबाद येथील फ्लॅटमध्ये ८ कोटी रुपये जप्त केले आहेत. वाल्मिकी घोटाळ्याच्या पैशाने सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपी …

Read More »

जीवनविद्या मिशनतर्फे आज कृतज्ञता दिन

  बेळगाव : जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने रविवार दि. २८ रोजी कृतज्ञता दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रीज बेळगांव येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत कार्यक्रम होणार आहे. गुरु पौर्णिमा व वामनराव पै जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला आहे. विश्व प्रार्थनेने सुरुवात …

Read More »

पीओपी मूर्तींना आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

  एकेरी वापराच्या प्लास्टिकवरही निर्बंध बंगळूर : एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभर मार्शलचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन केले जाईल. यावर्षी गणेश चतुर्थी दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा वापर केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी देखील टास्क फोर्स कठोरपणे काम करेल, वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर …

Read More »

मणतुर्गा येथे घर कोसळून नुकसान

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे गावातील प्रकाश रावबा देवकरी, सूर्याजी गणपती देवकरी, हणमंत देवकरी यांच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली असून ती घराशेजारी असलेल्या श्री नागेश देव मंदिरावर पडली. त्यामुळे मंदिराचे देखील नुकसान झाले आहे. दुपारच्या वेळी देवकरी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना भिंत कोसळली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी …

Read More »

खा. धैर्यशील माने – राहुल आवाडे यांच्या ड्रॉयव्हरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

  इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील नाट्यगृह परिसरात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांची चारचाकी गाडी लावण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. यादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी इचलकरंजी दौर्‍यावर आले होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. नेमकं प्रकरण काय? यावेळी …

Read More »