Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीच्या पूर परिस्थितीचा एनडीआरएफ टीमने घेतला आढावा

  चिकोडी : चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून, सदलगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरले आहे. किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे. या दूधगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासातासाला वाढत आहे. त्यामुळे सदलगा शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमने …

Read More »

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबियांची परिस्थिती पूर्णतः हलाखीची आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. पाटील …

Read More »

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवा; कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे विनंती

  कोल्हापूर : अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली भागाला महापुराचा पुन्हा मोठा धोका उद्भवू शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून कोल्हापूर आणि सांगली …

Read More »

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी नगदी पिकासह भाजीपाल्याची पिके घेत आहेत. त्यांना भाजीपाला आणि इतर पिकांच्या विक्रीसाठी बेळगाव आणि कोल्हापुर येथील बाजारपेठेला जावे लागते. पण यावेळी कोल्हापूरला जाताना कोगनोळी आणि बेळगावला जाताना हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांना टोल घेतला जातो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने …

Read More »

निःपक्षपातीपणे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी; खानापूर तालुका काँग्रेसची मागणी

  खानापूर : तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यात बऱ्याच घरांची पडझड होत आहे. पडझड झालेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करून तहसिलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत. यासाठी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे व्यवस्थित व्हावेत, पीडीओ व इंजिनियर यांनी लोकांना नाहक त्रास देऊ नये, स्वताच्या पगारातील पैसे द्यायचे असल्यासारखे जनतेशी वागू …

Read More »

अन कामगारांनी हटवली भली मोठी फांदी….

  बेळगाव : बेळगाव येथील “वन टच फाऊंडेशनचे” अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल फर्निचर उद्योजक श्री. विठ्ठल फोंडू पाटील यांच्या ऑटोनगर येथील फर्निचर दुकानच्या गल्लीमध्ये रात्री भली मोठी झाडाची फांदी तुटून पडलेली होती. तेथून या जायला वाहतुकीला रस्ता बंद झाला होता, ते पाहून विठ्ठल फर्निचर मधील काम करणाऱ्या सर्व कामगारांनी …

Read More »

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

    मुंबई : साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार …

Read More »

अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढविण्यासंदर्भात महापूर नियंत्रण कृती समितीची सरकारकडे मागणी

  सांगली : सांगली प्रशासनाने राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही, शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणी …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतीने लक्ष देण्याची मागणी

  खानापूर : नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्राम पंचायतीने कचरा टाकल्याने चरीतुन पाणी तलावात मिसळत आहे. तलावातील पाणी शेतीसाठी तसेच गुरांना पाणी पाजण्यासाठी वापरले जाते, या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच पाण्यात न विरघळणारे साहित्य येत असल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण …

Read More »