Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

नानावाडी येथील नाल्यात पडलेल्या रेडकाला जीवदान

  बेळगाव : मागील दोन दिवसापासून नानावाडी येथील नाल्यात पडलेल्या रेडकाला जीवदान देण्यात आले. त्यासाठी स्थानिक गॅरेज व्यावसायिक तसेच रिक्षाचालक सदस्यांनी पुढाकार घेतला. नानावाडी येथील नाल्यामधून सध्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतो आहे. त्यातच चुकून एक रेडकू पडले होते. सदर रेडकाला काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. तसेच त्यानंतर अग्निशामक दलाच्या …

Read More »

विर शिवा काशिद पुण्यतिथीनिमित्त जपल्या स्मृती…

  कोवाड : हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी नरवीर शिवा काशिद यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने नेसरी येथे आज शिवप्रेमी व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवा काशिद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव यांनी प्रास्ताविक केले, माजी …

Read More »

मर्कंटाईल सोसायटीच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लस

  बेळगाव : सध्या सर्वत्र डेंग्यूने थैमान माजले आहे त्यामुळे त्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन येथील मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने सुमारे 200 नागरिकांना डेंग्यू लस देण्यात आली. यंदा मर्कंटाईल या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या वर्षात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच …

Read More »

लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी एजंटराजला आळा घाला : पल्लवी जी यांची सूचना

  बेळगाव : जिल्हा केंद्रांमध्ये समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामंडळाची कामे पार पाडावीत. अधिकाऱ्यांना समाज कल्याण विभाग आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागातील प्रकल्पांसाठीच्या अर्जांच्या आकडेवारीची माहिती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी एजंटराजला आळा घाला, असे आवाहन कर्नाटक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त आणि अर्ध-भटक्या समुदाय विकास महामंडळाच्या अध्यक्षा …

Read More »

भाजी मार्केट व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

  बेळगाव : महात्मा फुले भाजी मार्केट व कांदा मार्केट येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचीही भेट घेतली आहे. मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली व्यथा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे. याआधी या व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी व पोलिस आयुक्त याडा मार्टीन यांची भेट घेतली आहे. मार्केटमध्ये त्यांना ज्या समस्या भेडसावत आहेत, …

Read More »

एंजल फाउंडेशनतर्फे बेघर लोकांना ब्लॅंकेटचे वितरण

  बेळगाव : सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि थंडीचे वातावरण वाढल्याने बेघर व गरीब लोकांची गरज ओळखून एंजल फाउंडेशन व फेसबुक फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरातील सीबीटी बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन येथे वास्तव करत असलेल्या बेघर लोकांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई …

Read More »

कटलरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून चार लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकावरील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे चौकाजवळ असलेल्या एका कटलरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) रात्री साडेनऊ वाजता सुमारास घडली. या घटनेमध्ये निशिकांत बागडे यांच्या दुकानातील प्लास्टिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे परिसरातील आग …

Read More »

मोदी सरकार वाढवणार किसान सन्मान निधीची रक्कम

  नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 23 जुलै रोजी सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधीतील रक्कम 30 टक्क्यांनी वाढवून सुमारे 80,000 कोटी रुपये केले जाणार आहेत. …

Read More »

…चक्क पुष्पवृष्टी करून केले जामीनावर सुटलेल्या बनावट डॉक्टरचे स्वागत!

  बेळगाव : भ्रूणहत्या आणि शिशु विक्री प्रकरणात अटक झालेल्या नकली डॉक्टरला जामीन मिळाल्यावर त्याचे हार घालून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आल्याची दुर्दैवी आणि निंदनीय घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर गावात ही घटना घडली. अब्दुल लाडखान असे या नकली डॉक्टरचे नाव आहे. शिशु विक्री प्रकरणात त्याला बेळगावातील माळमारुती पोलिसांनी अटक …

Read More »

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमध्ये काम करण्याची उर्मी

  धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये शिबिराची सांगता निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरांमुळे युवकांमध्ये कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. समाजात वेगळ्या प्रकारची जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ झाला आहे, असे मत ग्रामपंचायत …

Read More »