Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

दीपावलीच्या धर्तीवर साजरा करा रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : किरण जाधव यांच्याकडून जनजागृती

  बेळगाव : अयोध्या श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापन्यात आलेल्या भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार असून या सोहळ्याच्या अनुषंगाने अयोध्येसह सारा देश राममय करण्यात आला आहे. दीपावलीच्या धर्तीवर देशभर भगवान रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळादिन साजरा केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देवनगरी सज्ज झाली असून याच अनुषंगाने बेळगाव नगरीतदेखील प्राणप्रतिष्ठादिनी …

Read More »

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिवशी मांस, मद्य दुकाने बंद करण्यासाठी निवेदन

  निपाणी (वार्ता) : आयोध्या येथे सोमवारी (ता.२२) श्रीरामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. संपूर्ण देशात या सोहळ्यामुळे नवचैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. देशवासीयांसाठी हा दिवस पवित्र व सात्विक होत आहे. या दिवशी अनेक मंदिरामध्ये भजन, कीर्तन, सामूहिक नामजप ,महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या दिवशी निपाणी भागात …

Read More »

युवकाचा संशयास्पद मृत्यू; बुद्ध, बसव, आंबेडकर संघातर्फे निदर्शने

  बेळगाव : गोकाक तालुक्यातील खणगाव-देवगौडनहट्टी गावातील सागर उद्दप्पा परसण्णावर या युवकाच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची योग्य चौकशी व्हावी या मागणीसाठी बुद्ध, बसव, आंबेडकर इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेतर्फे बेळगावात आंदोलन करण्यात आले. बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बुद्ध, बसव, आंबेडकर इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांची कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

  बेळगाव : बेंगळुरू येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे चेअरमन श्री. सुरेश साठे यांनी बेळगावच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून डॉ. सोनाली सरनोबत यांची नियुक्ती केली आहे. एस. सुरेशराव साठे (राज्याध्यक्ष- कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद (नि.), टी. आर. व्यंकट राव चव्हाण (राज्य कोषाध्यक्ष- कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद), यांच्या हस्ते अधिकृत पत्र …

Read More »

रथयात्रेच्या मंडपाची मुहूर्तमेढ इस्कॉनमध्ये संपन्न

  बेळगाव- येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने येत्या दि. 10 व 11 फेब्रुवारी रोजी हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जयत तयारी सुरू असून शुक्रवारी सकाळी रथयात्रेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ श्री राधागोकुळानंद मंदिराच्या समोर करण्यात आली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत …

Read More »

पत्रकार बर्डे यांच्या निधनाबद्दल मंगळवारी शोकसभा

  बेळगाव : बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बेळगावच्या सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्राची प्रचंड मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पत्रकार विकास अकादमीतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जत्ती मठात मंगळवार दि. २३ रोजी दुपारी …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या लाक्षणिक उपोषण

  बेळगाव : सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने शनिवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ पर्यंत बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा योद्धा, मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून …

Read More »

म. ए. समितीच्या फलकाची प्रशासनाला कावीळ!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा कपिलेश्वर उड्डाणपूल येथे उभारण्यात आलेला मराठी भाषेतील फलक महापालिकेने पोलिस बंदोबस्तात हटवला. 22 जानेवारी रोजी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कपिलेश्वर उड्डाणपूलाशेजारी मराठी भाषेतील शुभेच्छा फलक उभारला …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील दैनिकांच्या संपादकांचा सत्कार

  बेळगाव : कर्नाटक राज्य दैनिक संपादक संघ यांच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील दैनिकांच्या संपादकांचा सत्कार संघाच्या बैठकीत बेंगलोर येथे करण्यात आला. दैनिक वृत्तपत्रांच्या अडचणींच्या विषयी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दैनिकांना मिळत असलेल्या जाहिराती आणि त्यांची बीले आणि प्रमाण तसेच दर वाढ या संदर्भात आपण सरकारकडे मागणी करावयाची आहे. यासाठी …

Read More »

शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली, दोन शिक्षकांसह १२ मुलांचा मृत्यू

  वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील हर्णी तलाव विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली. या हृदयद्रावक घटनेत दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 15 जणांची कॅपेसिटी असलेल्या बोटीवर न्यू सनराइज स्कूलचे 25-27 विद्यार्थी बसवले होते. यावेळी त्यांना लाईफ जॅकेदेखील घातले नव्हते. या घनटेची माहिती …

Read More »