बेळगाव : बेळगावात श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावात श्रीरामसेना हिंदुस्थानसह विविध हिंदूपर संघटनांनी श्रीराम नवमीचा उत्सव अत्यंत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढली. प्रभू श्रीरामचंद्र, रामभक्त हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सजीव देखाव्यांसह मिरवणूक निघाली. …
Read More »LOCAL NEWS
आम्हाला १०० दिवस काम द्या आणि नियमांनुसार भत्ताही द्या : कंग्राळी बी.के. येथील नरेगा कामगारांची मागणी
बेळगाव : १०० दिवस शासकीय नियमांनुसार काम द्या आणि त्यासाठी योग्य त्या भत्त्यांची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी आज कंग्राळी बी.के. येथील नरेगा ग्रामीण कामगारांनी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. ग्रामीण शेतमजूर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. नरेंगा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रोजगार हमीच्या कामाबाबत तक्रारी …
Read More »कोबीला योग्य हमीभाव, नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
बेळगाव : कोबीला मातीमोल दर मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. कोबी पिकाला योग्य हमीभाव द्यावा आणि नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी कोबी पिकाला योग्य हमीभाव द्यावा आणि नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ आणि …
Read More »औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी अयोग्य, पानिपतकार विश्वास पाटील यांचे मत
बेळगाव : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी योग्य नसल्याचे मत प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि केंद्रीय साहित्य अकादमीचे मराठी भाषा समन्वयक विश्वास पाटील यांनी येथे व्यक्त केले. सपना बुक हाऊस, बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी हे एक अतुलनीय वीर होते, असे मत व्यक्त केले. पूर्वी …
Read More »बेळगाव इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची स्थापना
बेळगाव : “बातम्या समाजाची शांतता बिघडवू नयेत, तर आरोग्यपूर्ण समाज घडवणाऱ्या असाव्यात, माध्यम हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून गौरवोद्गार करत प्रसार माध्यमामुळे बेळगावातील घडामोडी दिल्लीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे माध्यमांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.” असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. बेळगावात जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात …
Read More »धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींसाठी अभिमान : प्रकाश शिरोळकर
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी माजी आमदार कै संभाजी पाटील व मराठी भाषिकांनी परिश्रम घेतले असून पुतळा उभारणीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत याचा संपूर्ण शिवप्रेमीना अभिमान आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे. राम नवमीचे औचित्त साधून साहेब फाउंडेशन आणि …
Read More »वीर सौध योगा केंद्रातर्फे रामनवमी उत्सवात साजरी
बेळगाव : टिळकवाडी वीर सौध योगा केंद्रातर्फे श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी श्रीराम प्रतिमेचे विधिवत मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. योगा प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रामायणचा विचार करताना, त्यांच्या जीवनात चढ उतार, भावनिक हेलकावे, सामर्थ्यवान म्हणून …
Read More »भाजप उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मंडळातर्फे बेळगावात आंदोलन…
बेळगाव : महागाईसह अन्य समस्यांवरून राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत बेळगाव भाजपच्या उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मंडळतर्फे शनिवारी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा चौकात भाजपचे विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन सरकारविरोधात घोषणा देत निषेध फलक दाखवले. यावेळी बोलताना महापालिकेच्या भाजप अध्यक्ष गीता सुतार …
Read More »६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण
बेळगाव : मराठा मंदिर येथे रविवारी संपन्न होत असलेल्या सहाव्याअखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगरी सज्ज झाली आहे. ग्रंथ दिंडीला खाऊ कट्यापासून सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार असून मराठा मंदिर मध्ये सकाळी दहा वाजता हे संमेलन सुरू होईल. यंदाचे बेळगाबात …
Read More »भाषिक अल्पसंख्याक अहवालावर लोकसभेत चर्चा करावी : मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी
बेळगाव : सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र सरकारने निर्णायक पावले उचलून लोकसभेत भाषिक अल्पसंख्याक अहवालावर चर्चा करावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने समन्वयक मंत्री, खासदार आणि प्रमुख नेत्यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात सीमाभागातील सध्याची गंभीर परिस्थिती मांडण्यात आली आहे. या पत्रात सीमाभागात मराठी भाषेचा अभिमान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta