Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

मराठी विद्यानिकेतन शाळेची वेटलिफ्टर राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

  बेळगाव : आदिती शंकर पाटील राहणार कंग्राळी बी.के. ही विद्यार्थिनी सध्या मराठी विद्यानिकेतन शाळेत इयत्ता दहावी या वर्गात शिकत आहे. मंगळूर या ठिकाणी झालेल्या सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित स्कूल फेडरेशन ऑफ इंडिया राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आदिती शंकर पाटील यांनी 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत 17वर्षाखालील स्कूल गेम्स …

Read More »

महामार्गावरील दुभाजकाला ऑटोची धडक : चालकाचा मृत्यू

  बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावाजवळ ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकल्याने ऑटो चालकाचा मृत्यू काल दि. ३ रोजी रात्री झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. न्यू गांधीनगर येथील 45 वर्षीय मम्मदल्ली शब्बीरअहमद भारगीर असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. धामणे गावातील सासूच्या …

Read More »

एकाला मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष!

  बेळगाव : पाण्याच्या वादातून एकाला फावड्याने व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपातून सोनोली येथील तिघा जणांची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे. मारुती नारायण चांदिलकर (वय 50 वर्षे, धंदा -शेती), अनिकेत मारुती चांदीलकर (वय 23, धंदा -शेती) आणि मनोज मारुती चांदीलकर (वय 21, …

Read More »

उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेची विशेष रेल्वे सेवा

  बेळगाव : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी रेल्वे बोर्डाने नैऋत्य रेल्वेला विशेष रेल्वे गाड्या चालवण्यास मान्यता दिली. उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1) रेल्वे क्र. 06281/06282 म्हैसूर -अजमेर एक्सप्रेस उन्हाळी विशेष रेल्वे (11 फेऱ्या) : रेल्वे क्र. 06281 म्हैसूरहून एप्रिलमध्ये दि. 05,12,19,26 रोजी, मे मध्ये दि. 3,10,17,24, …

Read More »

येळ्ळूर रोड के.एल.ई. हॉस्पिटल नजीक रस्त्याशेजारी टाकलेला कचरा पेटवल्याने दुर्गंधीयुक्त धूर

  बेळगाव : रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे आणि कचरा जाळण्याचे प्रकार बेळगाव शहर परिसरात वाढले आहेत. येळ्ळूर रोडवर के.एल.ई. हॉस्पिटल नजीक रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा कोणा अज्ञाताने पेटवून दिल्यामुळे दुर्गंधीयुक्त प्रचंड धूर सुटल्याने परिसरातील रहिवाशांसह शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. येळ्ळूर रस्त्यावर के.एल.ई. …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुद्दा संसदेत

    नवी दिल्ली : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हद्दपारीची मुद्दा आता थेट लोकसभेत पोहोचला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांविरोधात होत असलेल्या कारवायांवरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते …

Read More »

हुतात्मा स्मृती भवनाच्या उभारणीवर कर्नाटक प्रशासनाकडून आडकाठी?

  बेळगाव : 1 जून 1986 रोजी झालेल्या कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादाच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे भव्य हुतात्मा “स्मृती भवन” उभारण्यात येणार आहे. मात्र मराठीची कावीळ असलेल्या काही कन्नड संघटनांचे म्होरके कर्नाटक प्रशासनाला हाताशी धरून या हुतात्मा स्मृती भवनाच्या उभारणीवर आडकाठी घालत आहेत. नुकताच …

Read More »

एस.आर.एस. हिंदुस्थान अनगोळने पटकावला धर्मवीर चषक -2025

  बेळगाव : पिरनवाडी येथील सनसेट वॉरियर्स यांच्यातर्फे आयोजित धर्मवीर चषक -2025 भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद एस. डी. लायन्स पिरनवाडी संघाला पराभूत करत एस. आर. एस. हिंदुस्थान अनगोळ संघाने पटकावले. पिरनवाडी येथे सदर क्रिकेट स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या मर्यादित 5 षटकांच्या अंतिम सामन्यात एस. डी. लायन्स …

Read More »

सीमाभागातील बहुआयामी व्यक्तीमत्त्व श्री. वाय. एन. मजुकर सर

  कर्तृत्वशाली नेतृत्वाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले येळ्ळूरचे सुपुत्र आणि सीमाभागातील सामाजिक, राजकीय, चळवळीतील बहुआयामी व्यक्तीमत्त्व लाभलेले श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक -अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुर सर यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात….. बेळगावातील येळ्ळूर हे क्रांतिकारकांचे, शिक्षण-संस्थापकांचे, शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावी सरांचा जन्म एका गरीब …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी विलास ना. घाडी

  बेळगाव : सोमवार दि. 31/03/2025 रोजी येळ्ळूर रोजी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक मावळते अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कार्यालय श्री बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी समितीचे जेष्ठ नेते, आजी- माजी लोकप्रतिनिधी व युवा समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समितीच्या नवीन कार्यकारणीची एकमताने …

Read More »