Thursday , December 18 2025
Breaking News

LOCAL NEWS

श्री ब्रह्मलिंग प्राथमिक कृषी पत्तीन सहकार संघ नियमित निलजी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध

  बेळगाव : श्री ब्रह्मलिंग प्राथमिक कृषी पत्तीन सहकार संघ नियमित निलजी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध ठरली. अध्यक्ष म्हणून श्री. मल्लाप्पा गोविंद गाडेकर तर उपाध्यक्षपदी सौ. सुशीला भाऊसाहेब मोदगेकर यांची फेरनिवड झाली आहे. श्री ब्रह्मलिंग पीकेपीएसने यंदाच्या निवडणुकीत देखील आपली बिनविरोधाची प्रथा कायम ठेवली असून खेळीमेळीच्या झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष आणि …

Read More »

दुसऱ्या मजल्यावरून पडून युवकाचा मृत्यू; दुसरा भाऊ जखमी

  बेळगाव : नशेत दोन भावांमध्ये वादावादी होऊन दोघेही दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला असून ही घटना बेळगाव तालुक्यातील निलजी येथे शुक्रवारी (ता. १०) रात्री उशिरा घडली. सुशांत सुभाष पाटील (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मोठा भाऊ ओंकार (२३) जखमी …

Read More »

गौरी लंकेश हत्या प्रकरण; शरद कळास्करला जामीन मंजूर

  प्रकरणातील सर्व आरोपी आता जामीनावर बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दहावा आरोपी शरद भाऊसाहेब कळास्कर याला बंगळुरच्या प्रधान शहर दिवाणी व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. यासोबतच खटल्याला सामोरे जात असलेल्या सर्व १७ आरोपींना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे शरद भाऊसाहेब कळास्कर यांनी दाखल …

Read More »

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची शस्त्रेही जप्त

  कोप्पा तालुक्यातील मेगुरु जंगलात सापडली शस्त्रे बंगळूर : नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या सहा नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या सततच्या शोधानंतर पोलिसांना चिक्कमंगळूर येथील मेगुरुच्या जंगल परिसरात सहा बंदुका आणि दारूगोळा सापडला. त्याचप्रमाणे एक एके-५६, …

Read More »

श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा 13 जानेवारीपासून बेळगावात

    बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून 13 जानेवारी रोजी रात्री बेळगावात येत आहे. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे राहणार असून 14 जानेवारीला दत्त मंदिर वडगाव येथील परिक्रमेनंतर …

Read More »

साठे प्रबोधिनीतर्फे साहित्यिक गप्पाटप्पांचा कार्यक्रम; लेखक डॉ. शरद बाविस्कर यांची भेट

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनयू विद्यापीठाचे प्राध्यापक, भुरा या चरित्रात्मक कादंबरीचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्यासोबत गप्पाटप्पांचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साठे प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर उपस्थित होते. त्यांच्या …

Read More »

युवा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहा; चलवेनट्टी भागात जागृती सभा

    बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका आघाडीतर्फे येत्या 12 जानेवारी रोजी जागतिक युवा दिनानिमित्त युवा मेळावा आयोजित केलेला आहे, महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या या मेळाव्याला चलवेनट्टी व इतर भागातील युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आज करण्यात आले. चलवेनट्टी …

Read More »

समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकावर दडपशाहीचा आरोप…

  बेळगाव : समाजकल्याण विभागाकडून दडपशाहीचा आरोप असलेल्या तालुका अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी दलित संघर्ष समिती भीम वादच्या वतीने आंदोलन करून करण्यात आली. समस्या न सुटल्यास मंत्र्यांच्या गाडीला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला. बेळगाव तालुका समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक महांतेश चिवटगुंडी हे दलित समाजाचे नेते, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यावर अत्याचार करीत …

Read More »

उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला : सुदैवाने जीवितहानी नाही

  हारुगेरी : उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहरात शुक्रवारी सकाळी घडली. साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला. हारुगेरी-रायबाग मार्गावरील संगोळी रायण्णा सर्कलजवळ ही घटना घडली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टर चालकाचा निष्काळजीपणा या घटनेला कारणीभूत असल्याचे उघड झाले असून, हारुगेरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी …

Read More »

रस्त्यावरील विक्रेत्यांना महापालिका कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचा आरोप; आंदोलन

  बेळगाव : बेळगावच्या आझमनगर येथील रस्त्यावरील विक्रेत्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास होऊ नये म्हणून बेळगाव महानगर पालिकेसमोर आंदोलन केले. यावेळी नगरसेवक व आयुक्तांच्या मध्यस्थीने त्यांचा प्रश्न सोडविण्यात आला. बेळगावच्या आझम नगरमध्ये रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना त्रास देऊन मनपाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा भाजीपाला पळवून नेल्याच्या निषेधार्थ बेळगाव महापालिकेसमोर त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर नगरसेवक …

Read More »