Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

नवजात बालिकेला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ; बालिकेचा मृत्यू

  बेळगाव : नवजात बालिकेला रुग्णालयात सोडून आईने पळ काढला आणि उपचार सुरू असलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना बेळगावातील बिम्स रुग्णालयात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, बैलहोंगल येथील बीबीजान सद्धाम हुसेन सय्यद या महिलेला ८ डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी एका मुलीला …

Read More »

बेळगाव लवकरच सुसज्ज पत्रकार भवनाची उभारणी : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : अनेक दिवसांपासून माध्यम प्रतिनिधींच्या इच्छेनुसार बेळगावात सुसज्ज प्रेस हाऊस बांधण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आज शुक्रवारी (१२ डिसेंबर) येथील विश्वेश्वरय्या नगरमध्ये पत्रकार भवन आणि उद्यान विभाग कार्यालयाच्या इमारतींच्या पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, …

Read More »

चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांची कोवाड येथे भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आ. शिवाजी पाटील यांचा टक्केकर यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. आमदार शिवाजी पाटील यांच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख होता. निवडून आल्यानंतर आ. पाटील यांनी सीमाभागातील …

Read More »

सुळगा (हिं.) येथे श्री जोतिबा व काळभैरव मंदिराचे भूमिपूजन

सुळगा (हिं.) : कुलदैवतेला जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. शुभकार्यात कुलदैवतेला पहिला मान दिला जातो. बऱ्याच जणांना स्वतःचे कुलदैवत माहीत नसते. मात्र कुटुंबावर संकटे येतात त्यावेळी कुलदैवतेची आठवण होते. तेव्हा प्रत्येकाने स्वतःचे कुलदैवत जाणून घेणे महत्त्वाचे आहे,असे मत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते श्री. आर. एम. चौगुले …

Read More »

“भेकणे” परिवाराचा आधारवड हरपला!

  “जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणेच आमचे बंधू कै. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांची अचानक झालेली “एक्झिट” मनाला चटका लावून गेली. अगदी रात्रीपर्यंत आमच्या सर्वांशी गुजगोष्टी करणारे सकाळी अचानक आमच्यातून नाहीसे झाले. दि. 2 डिसेंबर 2024 रोजी श्री. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांना देवाज्ञा झाली. आज बारावा दिवस त्यानिमित्ताने…. …

Read More »

कडोलीत रविवारी काव्यतरंग कार्यक्रम

  कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 15 डिसेंबर रोजी “काव्यतरंग” हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात दुपारी 3.30 वाजता हे कविसंमेलन रंगेल. या कविसंमेलनात बेळगाव परिसरातील 25 कवी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये कांही नामवंत कविंच्या कविता ऐकण्याची …

Read More »

“कॅपिटल-वन” एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला वेळापत्रक जाहीर

  बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे. रविवार दि. १५/१२/२०२४ पासून रविवार …

Read More »

बेळगावमध्ये महामार्गावर मार्ग रोखून पंचमसाली समाजबांधवांचे आंदोलन

  बेळगाव : पंचमसाली समाजाने हिरेबागेवाडी महामार्गावर रास्ता रोको करून सरकारच्या धोरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. २ ए आरक्षणासाठी कुंडलसंगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्यात आले. सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा तीव्र निषेध करत आज राज्यभर पंचमसाली समाजाने महामार्गावर …

Read More »

पंचमसाली आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध करत सुवर्णसौध समोर भाजपाची निदर्शने

  बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आज सुवर्णसौध समोर भाजपाच्या वतीने निदर्शने केली गेली. मूलभूत आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाजावर सरकारकडून हल्ला करवण्यात आल्याचा आरोप करत, आज सुवर्ण सौध समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपाचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक …

Read More »

कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही : गृहमंत्री जी परमेश्वर यांचा इशारा

  बेळगाव : पंचमसाली समाजाला लोकशाही मार्गाने शांततेने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करत आंदोलन करण्याचा परवानगी देण्यात आली होती‌ मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही, असा …

Read More »