Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

कंग्राळ गल्ली श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न

  बेळगाव : कंग्राळ गल्लीतील श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व पंच श्री. शंकरराव बडवानाचे यांच्या अध्यक्षतेखाली भरून या बैठकीत सन 2024-25 या वर्षाचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीस गल्लीतील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर गतवर्षीच्या जमाखर्चाला मंजुरी अनंतराव पाटील देण्यात आली. …

Read More »

तुंगभद्रा गेट फुटीचे राजकारण करणे अयोग्य

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; शेतकऱ्यांचे हित महत्वाचे बंगळूर : तुंगभद्रा जलाशयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तुंगभद्रा मंडळाकडे आहे. पण, या प्रकरणात मी कोणाला दोष देत नाही. जलाशयातील १९ क्रस्ट गेट काढल्याच्या प्रकरणावर आम्ही राजकारण करणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. तुंगभद्रा जलाशयाला भेट देण्यापूर्वी कोप्पळ येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, तुंगभद्रा जलाशयाकडे सरकारचे …

Read More »

एचएमटीची २८१ एकर जमीन परत मिळविण्याच्या सूचना

  केंद्रीय मंत्री कुमारस्वामीनी राज्याच्या वनमंत्र्यांना फटकारले बंगळूर : हिंदुस्तान मशिन टूल्स (एचएमटी) लिमिटेडकडून २८१ एकर जमीन परत मिळविण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याबद्दल केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी कर्नाटकचे वन मंत्री ईश्वर खांड्रे यांना चांगलेच फटकारले. कुमारस्वामी यांनी वनमंत्र्यांना “आपली क्षुद्रता सोडा” …

Read More »

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या विविध सूचना

  बेळगाव : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी/पूरस्थिती निर्माण झाली असून, नुकसान झालेल्या घरांची ठिकाणे ओळखून त्याची माहिती गृहनिर्माण महामंडळाच्या पोर्टलवर टाकून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, शेती व बागायती पिकांच्या नुकसानीचे संबंधित विभागांसोबत संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे व नुकसानीची आकडेवारी रिलीफ पोर्टलमध्ये समाविष्ट …

Read More »

यल्लम्मा डोंगरावर कुकरचा स्फोट; १० हून अधिक लोक जखमी

  बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा स्फोट होऊन १० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना सौंदत्ती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तिघांना हुबळी किम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे, सौंदत्ती येथे देवाच्या दर्शनासाठी आलेले भाविक सौंदत्ती यल्लम्मा डोंगरातील …

Read More »

नावगे कारखाना दुर्घटना: खासदार जगदीश शेट्टर यांनी मृत कामगाराच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

  बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी आगीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नावगे औद्योगिक परिसरातील एका खाजगी कारखान्याला नुकत्याच झालेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी आज कारखान्याला भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व अपघात होऊ नयेत यासाठी कारखानदारांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे सांगितले. …

Read More »

कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे उद्या बेळगाव रेल्वे स्थानकावर आंदोलन

  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकावर राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी 14 ऑगस्टला तीव्र आंदोलन करणार असल्याचे कर्नाटक दलित संघर्ष समितीचे रवी बस्तवाडकर यांनी सांगितले. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक दलित संघर्ष समितीचे रवी बस्तवाडकर यांनी दोन वर्षांपूर्वी बेळगाव शहरातील …

Read More »

बैलहोंगल येथील बेनकट्टी एकाच खून : आरोपीला अटक

  बैलहोंगल : बैलहोंगल जवळील बेनकट्टी गावात एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली आहे. सवदत्ती तालुक्यातील बेनकट्टी गावातील कडप्पा रुद्रप्पा शिरसंगी (४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मण देवेंद्रप्पा हुली (21, रा. मबनूर) आणि सतीश यमनाप्पा अरिबेची (28, रा. जिवापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुरगोड पोलिसांनी …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून श्रद्धा ताडे यांना 25 हजाराची मदत

  बेळगाव : मागील महिन्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी बेळगावचा के.एल.ई हॉस्पिटलला धावती भेट दिली. या वेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व माजी महापौर श्री. मालोजीराव अष्टेकर व खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांच्यासोबत …

Read More »

बोअरवेलचे पाणी पिल्याने ४१ हून अधिक आजारी

  सौंदत्ती : बोअरवेलचे पाणी पिल्याने ४१ हून अधिक जण आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथे घडली. एका महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वजण आजारी होते. सोमवारी अचानक तब्येत बिघडल्याने ग्रामस्थांना उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. …

Read More »