Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यावतीने वृक्षारोपण

  बेळगाव : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी श्री ब्रह्मदेव मंदिर परिसर मजगांव या ठिकाणी रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी वृक्षारोपण मोहीम आयोजित केले होते. वृक्षारोपण समारंभासाठी श्री ब्रह्मदेव मंदिरचे चेअरमन शिवाजी पठण, श्री संप्रदाय सेवा केंद्र बेळगाव शहर जिल्हा अध्यक्ष …

Read More »

गोकाक, मुडलगी तालुक्यातील शाळांना २९ व ३० जुलै रोजी सुट्टी जाहीर

  निप्पाणी, हुक्केरी, कागवाड आणि चिक्कोडी तालुक्यातील निवडक गावांमधील शाळांनाच सुट्टी बेळगाव : पावसाचा जोर पाहता गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवार (29 जुलै) आणि मंगळवारी (30 जुलै) अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निप्पाणीतील इतर गावे म्हणजे सिदनाळ, हुन्नरगी, …

Read More »

वडगाव श्री मंगाई जत्रेत पशुबळी बंद करा…

  बेळगाव : जागतिक प्राणी कल्याण मंडळ व पशुबळी निर्मूलन जागृती महासंघ, बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी कर्नाटक सरकार, बेळगाव जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाला आवाहन केले आहे की, बेळगाव वडगाव श्री मंगाई देवीच्या जत्रेत पशुबळी रोखण्याचे आवाहन केले आहे. 30 जुलै रोजी बेळगावात वडगाव ग्रामदैवत श्री …

Read More »

वाल्मिकी घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या घरात सापडले १० किलो सोने

  बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळाचे कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्याचा तपास तीव्र करणाऱ्या सीआयडी आणि एसआयटीच्या तपास पथकाने मुख्य आरोपी सत्यनारायण वर्माच्या घरात लपवून ठेवलेली १० किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. तसेच हैदराबाद येथील फ्लॅटमध्ये ८ कोटी रुपये जप्त केले आहेत. वाल्मिकी घोटाळ्याच्या पैशाने सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपी …

Read More »

जीवनविद्या मिशनतर्फे आज कृतज्ञता दिन

  बेळगाव : जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने रविवार दि. २८ रोजी कृतज्ञता दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रीज बेळगांव येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत कार्यक्रम होणार आहे. गुरु पौर्णिमा व वामनराव पै जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला आहे. विश्व प्रार्थनेने सुरुवात …

Read More »

पीओपी मूर्तींना आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

  एकेरी वापराच्या प्लास्टिकवरही निर्बंध बंगळूर : एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभर मार्शलचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन केले जाईल. यावर्षी गणेश चतुर्थी दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा वापर केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी देखील टास्क फोर्स कठोरपणे काम करेल, वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर …

Read More »

संत मीरा, शांतीनिकेतन पदवी कॉलेज बेळगाव, आरव्हीके बेंगळूर यांना विजेतेपद

  बेळगाव : माळमारुती येथील स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर संतमीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती राज्यस्तरीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा अनगोळ तिहेरी मुकूट व शांतिनिकेतन पदवीपूर्व कॉलेज खानापूर बेळगांव व आरव्हीके स्कूल बेंगलोर यांनीही विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या 14 वर्षाखालील गटातील अंतिम लढतीत आरव्हीके स्कूल बेंगळूर …

Read More »

होनगा येथील बालिकेचा डेंग्यू आजाराने मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील प्रणाली परशुराम हिंदरे या १४ वर्षीय बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू असल्याची माहिती मिळाली आहे. सदर बालिकेला रविवारी फक्त दोन वेळा उलट्या झाल्या आणि सोमवारी तिला ताप आला. प्रणालीच्या कुटुंबीयांनी तिला मंगळवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार न झाल्याने तिचा आज मृत्यू झाला. …

Read More »

बेळगाव-कोल्हापूर महामार्गावर पाणी; वाहतुकीस अडथळा

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बेळगाव-कोल्हापूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर जादा पाणी आल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळजवळ हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. जास्तीचे पाणी शेतात आणि तेथून राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर …

Read More »

गोकाक येथे घटप्रभा नदीला पूर; अनेकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात घटप्रभा नदीला पूर आल्याने 300 हून अधिक घरे, 150 हून अधिक दुकाने पाण्याखाली गेली आहेत, बाजारपेठ, दुकाने, रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. घरे, दुकाने, बेकरी, गॅरेज जलमय होऊन अराजकता …

Read More »