बेळगाव : बेळगावात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत. प्रेमाला नकार दिल्याने संतप्त तरुणाने नर्सवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बेळगावात 30 ऑक्टोबर रोजी घडली होती. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने आज उघडकीस आली. याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगावातील एका खासगी रुग्णालयातील नर्सने प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या …
Read More »LOCAL NEWS
महामेळाव्यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 9 डिसेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जाईल, अशी माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …
Read More »सीपीआयकडून पोलीस कॉन्स्टेबलचा छळ : पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
बेळगाव : वरिष्ठांकडून छळ करण्यात आल्यानंतर तहसीलदार कार्यालयातील एसडीए कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना सीपीआयकडून छळ झाल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बेळगावच्या उद्यमबाग पोलीस ठाण्याचे सीपीआय (पोलीस निरीक्षक) धरमगौडा पाटील यांच्या विरोधात छळ केल्याचा आरोप करण्यात आला असून या कारणामुळे पाच पानी पत्र …
Read More »स्वयंभूवरद सिद्धिविनायक मंदिरात 2 ते 6 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम
बेळगाव : मार्कंडेय नगर, एपीएमसी समोर येथील निवासी मलिकार्जुन सत्तीगिरी यांच्या स्वप्नात सातत्याने दर्शन दिलेल्या आणि कुडाळ जवळील जंगलात सापडलेल्या द्विभुज स्वयंभूवरद सिद्धीविनायक मंदिराची प्रतिष्ठापना मार्कंडेय नगरात 2018 साली करण्यात आली असून तेथे यंदा 6 डिसेंबर रोजी महालक्ष्मी महा सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचे कळसा रोहन होणार आहे. या …
Read More »वॉर्ड समित्यांसाठी व्यापक जागृती व्हावी; वॉर्ड समिती संघाची मनपा आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासाठी वॉर्ड समिती स्थापन करणे आवश्यक आहे. महापालिकेकडून वॉर्ड समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रत्येक कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या लाऊडस्पिकरवरून ऑडिओ संदेश द्यावा, अशी मागणी बेळगाव वॉर्ड समिती संघाच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांच्याकडे करण्यात आली. वॉर्डमधील समस्या त्वरित …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल; मुडा घोटाळ्याला नवा ट्विस्ट
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती बी. एम. यांच्या मुडा घोटाळ्याला एका महिलेने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध दिवाणी खटला दाखल केल्याने नवीन वळण लागले आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने म्हैसूरच्या केसरे गावात पार्वती बी. एम. यांनी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला १४ भूखंडांचे वाटप केले होते. मात्र …
Read More »येळ्ळूर येथे जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धा
बेळगाव : सन्मित्र फौंडेशन येळ्ळूर यांच्यावतीने रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धेची सुरुवात सकाळी 9 वाजता होणार आहे. मुला-मुलींसाठी खुल्या गटात बेळगांव जिल्हा मर्यादित भव्य खो-खो स्पर्धा नवहिंद क्रिडा केंद्र मैदान-महाराष्ट्र हायस्कूल समोर, आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. 501/- असुन दोन्ही गटांसाठी अनुक्रमे रु.10,001/- …
Read More »महांतेश नगर येथील केएमएफ डेअरी जवळ युवकावर गोळीबार
बेळगाव : महांतेशनगर येथील केएमएफ डेअरीजवळ टिळकवाडी येथील प्रणीत कुमार (वय 31) द्वारकानगर, टिळकवाडी याच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. प्रणित कुमार ह रात्री जेवणासाठी डेअरीजवळ उभा असताना ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन राऊंड गोळीबार करून पळ काढला. प्रणीत …
Read More »कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित परवानगी द्या
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे केंद्रीय मंत्र्यांना आवाहन बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्यांना कळसा-भांडूरी सिंचन प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीला गती देण्याची विनंती केली. जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन कळसा-भांडूरी प्रकल्प राज्याच्या पाण्याच्या …
Read More »सौंदत्ती देवस्थानासाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव
बेळगाव : अनेक राज्यांमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्यात आला आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन लोकापुर – सौंदत्ती धारवाड, या नव्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. या रेल्वेमार्गामुळे लाखो रेणुका भक्तांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta