Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

छोटी साहित्य संमेलने म्हणजे अभिरुची घडविणारी रसशाळाच : रणजीत चौगुले

  बेळगाव : सीमाभागात होणारी छोटी छोटी साहित्य संमेलने म्हणजे या भागात भाषिक ऊर्जा निर्माण करणारी केंद्रे झाली असून भाषेच्या माध्यमातून या ठिकाणी संस्कार करण्याचे काम या साहित्य संमेलनामध्ये होत असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मधून जे घडत नाही असे कार्य या छोट्या साहित्य संमेलनामधून होत असून या ठिकाणावरून …

Read More »

सकल मराठा समाजातर्फे 20 रोजी लाक्षणिक उपोषण

  बेळगाव : आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले असून त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या 20 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांच्या सोमवारी सायंकाळी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत उपरोक्त लाक्षणिक …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा श्रीक्षेत्र विकासाचा मास्टर प्लॅन लवकरच : मंत्री रामलिंग रेड्डी

  बेळगाव : दरवर्षी लाखो लोक भेट देणाऱ्या सौंदत्ती यल्लम्मा रेणुका मंदिर आणि यल्लम्मा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे परिवहन आणि मुजराई विभागाचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले. मंत्री रामलिंगारेड्डी यांनी आज सोमवारी यल्लम्मा मंदिराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी …

Read More »

‘प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटी’चे कार्य कौतुकास्पद : महापौर शोभा सोमनाचे

  बेळगाव : येळ्ळूर येथील ‘प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटी’ने आर्थिक क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सोसायटीने सहकाराच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी कार्य करत राहिले पाहिजेत, असे प्रतिपादन महापौर शोभा सोमनाचे यांनी सोसायटीच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी चेअरपर्सन माधुरी पाटील या होत्या. नगरसेविका सारीका पाटील यांनी, सोसायटीचे कार्य पाहून मी भारावून …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२४ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत. ही स्पर्धा येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे होणार …

Read More »

आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचे उद्घाटन

  बेळगाव : हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटकशी संलग्न असलेल्या हॉकी बेळगांव संघटनेतर्फे आयोजित मुला-मुलींच्या भव्य आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी बेळगांव येथे पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नियती फाउंडेशन संस्थापिका डॉ. सोनाली सरनोबत, माजी बुडा अध्यक्ष श्री. …

Read More »

कन्नड सक्तीकरणाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

  बेळगाव : सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांनी मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सीमाभागात कानडी संघटनाच्या वतीने मराठी भाषिकांच्या फलकावर वाढत्या कन्नड सक्तीकरणाविरोधात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केले आहे. तरी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या …

Read More »

स्वामी समर्थांच्या पालखीचे बेळगावात 12 जानेवारी रोजी आगमन

  बेळगाव : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी पालखीचा पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाचे हे 27 वे वर्ष असून या सोहळ्याला 25 नोव्हेंबर 2023 रोजी सोलापूर येथून प्रारंभ झाला असून ही पालखी आता महाराष्ट्राच्या विविध भागात परिक्रमा करीत आहे. ही पालखी 12 जानेवारी रोजी कोवाडहुन …

Read More »

आनंदवाडी आखाड्याची मुहूर्तमेढ

  बेळगाव : रविवारी सकाळी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेची तयारी करण्यासाठी आनंदवाडी आखाड्यात माजी विधानपरिषद सदस्य माननीय श्री. महांतेश कवटगीमठ, गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अध्यक्ष मारूती घाडी, डॉ. गणपत पाटील, स्वातंत्र्य सैनिक संघाचे अध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या उपस्थितीत आखाड्याचे पुजन करून मुहूर्तमेढ करण्यात …

Read More »

उसाने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

  गोकाक : गोकाकजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील लोळसुरजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात लोळसुर पूल ते नाका क्रमांक 1 दरम्यान झाला आहे. भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर …

Read More »