बंगळूर : अभिनेत्री आणि मंड्यातील अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांनी शुक्रवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटक निवडणूक प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा …
Read More »LOCAL NEWS
लोकसभा निवडणूक; समितीकडे महादेव पाटील यांचा अर्ज दाखल
बेळगाव : आगामी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आज शुक्रवार दिनांक ५/४/२०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे ज्येष्ठ नेते महादेव तुकाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला. मदन बामणे, अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांनी अर्ज स्वीकारला. यावेळी रणजित चव्हाण पाटील, गुणवंत पाटील, रामचंद्र मोदगेकर, दत्ता जाधव, सागर पाटील, रणजित हावळानाचे, उमेश पाटील, प्रशांत …
Read More »अमित शहांचा दिल्लीत ईश्वरप्पांच्या भेटीस नकार; संतप्त ईश्वरप्पा बंडखोरीवर ठाम
बंगळूर : येडियुरप्पा यांच्या कुटुंबाविरोधात संताप व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा आता भलतेच संतापले आहेत. भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलाविले आणि भेट न देताच माघारी पाठविले. चन्नपट्टणम येथील रोड शो कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमित शाह बंगळुरला भाजप नेत्यांच्या …
Read More »मृत्यूवर विजय मिळवणारा सात्विक; २० तासाच्या ऑपरेशननंतर कूपनलिकेतून सुरक्षित सुटका
बंगळूर : विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान गावातील बागेत कूपनलिकेत पडलेल्या सात्विक या दोन वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी रात्रभर राबवण्यात आलेल्या ऑपरेशनला यश आले आहे. पोलिस, अग्नि शामक दल, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्या २० तासांच्या ऑपरेशननंतर मुलाला वाचवण्यात यश आले. कूपनलिकेतून बाहेर काढलेल्या सात्विक नावाच्या मुलावर तात्काळ प्राथमिक उपचार करून रुग्णालयात …
Read More »हलगा-मच्छे बायपासला उच्च न्यायालयाची स्थगिती
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासप्रकरणी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका दिला आहे. गुरुवारी (दि. ४) न्यायालयाने बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली. या आदेशामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू केलेल्या महामार्ग प्राधिकरणाला पुन्हा गाशा गुंडाळावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. हलगा-मच्छे …
Read More »गणेशपुर भागातील एका कॉलनीत विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल
बेळगाव : गणेशपूर भागातील एका रहिवासी कॉलनीमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एम ई एस कॉलनी मधील खुल्या जागेत काही वर्षांपूर्वी कॉलनीतील दानशूर लोकांच्या सहभागातून लहानसे गणेश मदिर उभारण्यात आले आहे. सदर जागेचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याने लोकप्रतिनिधींच्या मदतीने निवडणुकीच्या तोंडावर सदर जागेच्या विकासाचा नारळ फोडण्यात …
Read More »समिती नेत्यांना पोलिसांकडून नोटीस; पोलीस आयुक्तांसमोर उद्या हजर होऊन जामीन घेण्याची सूचना
बेळगाव : म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजी उद्यान येथून मूक सायकल फेरी काढण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा तसेच कर्नाटक राज्याविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या असून कायद्याचा भंग केला आहे, असे कारण पुढे करून म. ए. समितीच्या नेत्यांनी जामीन …
Read More »लोकसभा निवडणूक लढवणार नाही : खासदार सुमलता अंबरीश
भाजपात प्रवेश करणार बंगळूर : साखर भूमी असलेल्या मंड्याशिवाय माझे कोणतेही राजकीय जीवन नाही. आज मी तुमच्यासमोर शपथ घेते की मंड्याचे आणि या मंड्यातील जनतेचे ऋण मी कधीही विसरणार नाही, असा पुनरुच्चार खासदार सुमलता अंबरिश यांनी केला. यावेळी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करून सहा एप्रील रोजी भाजपात प्रवेश करणार …
Read More »हलगा -मच्छे बायपासबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी
बेळगाव : बायपासबाबत उच्च न्यायालयात गुरुवार (ता. ४) होणार आहे. शेतकऱ्यांचे लक्ष सुनावणीकडे लागून आहे. २००९ पासून हलगा -मच्छे बायपास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. काम बंद ठेवावे यासाठी प्रयत्न असून बायपासच्या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकून …
Read More »आमदार लक्ष्मण सवदी यांच्या निकटवर्तीयाची निर्घृण हत्या
बेळगाव : अथणी येथील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले अण्णाप्पा बसण्णा निंबाळ (वय ५८) यांची काल बुधवारी रात्री अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अण्णाप्पा बसण्णा निंबाळ हे आमदार लक्ष्मण सवदी यांचे निकटवर्तीय होते. याबाबत समजलेली माहिती अशी की, अण्णाप्पा निंबाळ हे खिळेगाव देवस्थान परिसरामध्ये गोदामाचे बांधकाम करीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta