Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

आयटी छाप्यात ४२ कोटी जप्त

  दुसऱ्या दिवशीही प्राप्तीकरची कारवाई सुरूच बंगळूर : आयकर (आयटी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहराच्या अनेक भागात छापे टाकले आणि सुमारे ४२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातून विविध राजकीय पक्षांना निधी दिला जात असल्याच्या काही माहितीच्या आधारे काल प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी (आयटी) टाकलेले छापे आजही सुरूच राहिले. …

Read More »

दसरा मुख्यमंत्री हॉकी स्पर्धेसाठी महिला संघाला जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा

  बेळगांव : बेळगावला हाॅकीची परंपरा असून राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री हाॅकी स्पर्धेसाठी बेळगावचा महिला हॉकी संघ रवाना होत आहे, महिला संघाने कौशल्य पणाला लावून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत व बेळगावचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, बेळगावची एस्ट्रोतर्फ हॉकी मैदानाची मागणी …

Read More »

मानवी तस्करी, गुलामगिरी रोखण्यासाठी उद्या मूक मोर्चाचे आयोजन

  बेळगांव (वार्ता) : अलीकडे बेंगळुरू पाठोपाठ कर्नाटक राज्यात महिला आणि मुलांचे लैंगिक अत्याचार आणि विक्रीच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. बेळगाव जिल्ह्याची सीमा महाराष्ट्र, गोव्याला लागून आहे. विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हरवलेली मुले, लैंगिक अत्याचार, पीओसी कायद्यांतर्गत प्रकरणे, प्रेम प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बेळगावात याला आळा घालण्यासाठी …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन 18 नोव्हेंबर रोजी

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये 23 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. प्रथमतः प्रबोधनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. बैठकीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत निषेध …

Read More »

खेळाडूच्या स्वप्नपूर्तीसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलची लाभली साथ

  बेळगाव : सेवानिवृत्त शिक्षक श्री. वाय.पी. नाईक यांना बेळगाव जवळील बहाद्दरवाडी गावातील खेळाडूचा फोन आला. खेळात सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. लागलीच श्री. वाय. पी. नाईक यांनी त्यांचे मित्र श्री. संतोष दरेकर यांना फोन केला आणि फेसबुक फ्रेंड सर्कलच्या संतोष यांनी रियाला मदत करण्यासाठी त्याच्या मित्रांना …

Read More »

कित्तूर उत्सवाच्या ज्योती यात्रेचा शुभारंभ

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने चन्नम्मा कित्तूर उत्सव 2023 चा भाग म्हणून विधान सौधासमोर आयोजित केलेल्या ज्योती यात्रेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चन्नम्माच्या कित्तूर महोत्सवाच्या ज्योती यात्रेचे उद्घाटन केले. स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या वीर नारी कित्तूर राणी चन्नम्मा …

Read More »

बेळगावात बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई; गणेशपूर येथे ९ लाखांचे फटाके जप्त

  बेळगाव : कर्नाटक-तामिळनाडूच्या सीमेवरील अत्तीबेले येथे गोदामात फटाके उतरविताना घडलेल्या आग दुर्घटनेत १५ जणांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. बेळगावतही पोलिसांनी बेकायदा फटाके विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. गणेशपूर येथे ९ लाखांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत. गणेशपूर येथील व्यापाऱ्याने मागवलेले वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांचे ३१ बॉक्स …

Read More »

बहाद्दरवाडीची रिया पाटील हिला विविध भागातून सहकार्य

  किणये : बहाद्दरवाडी गावची रिया कृष्णा पाटील हिने मंगळूर येथे झालेल्या राज्य पातळीवरील भालाफेक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. तिची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. आज दि. १३ रोजी ती राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. यामुळे तिला विविध भागातून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. रिया पाटील हिच्या …

Read More »

सोन्याचे व्यापारी, व्यवसायिकांच्या घरावर आयटी छापे

  बंगळूर : पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी कर्नाटक राज्याकडून विविध राजकीय पक्षांना निधी दिला जात असल्याच्या माहितीवरून प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी (आयटी) ज्वेलर्स, व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. आज सकाळी कारवाई करून आयटी पथकांनी कांही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांचा तपास सुरू केला आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी आज …

Read More »

मागणी वाढल्याने राज्यात तीव्र वीज टंचाई

  वीज खरेदीची तयारी; पावसाअभावी वीजनिर्मितीवर परिणाम बंगळूर : राज्यातील वीज टंचाई भरून काढण्यासाठी सरकारने इतर राज्यांकडून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विजेची सध्याची मागणी १६ हजार मेगावॅट आहे, गेल्या वर्षी विजेची मागणी १२ हजार मेगावॅट होती. सध्या वीजनिर्मितीतही तुटवडा असून राज्यातील अनेक भागात अनियमित व अनधिकृत लोडशेडिंग …

Read More »