येळ्ळूर : शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक आठ वाजता सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथील सहशिक्षिका सौ. एस्. एस्. बाळेकुंद्री यांना रोटरी क्लब ऑफ बेलगाम यांच्यामार्फत नेशन बिल्डर अवार्ड तसेच शाळेच्या कन्नड शिक्षिका श्रीमती एच्. आर. अरेर यांना सरकारी मराठी शिक्षक कल्याण संघ बेळगाव …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव, खानापूर तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर
११ जिल्ह्यातील आणखी २१ तालुक्यांचा समावेश बंगळूर : पहिल्या यादीत वगळण्यात आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या आधी राज्यातील १९५ तालुके दुष्ळग्रस्त म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. त्यात आता ११ जिल्ह्यातील आणखी २१ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे …
Read More »दोन टिप्पर-क्रूझर अपघात; ७ ठार
होस्पेट येथील दुर्घटना बंगळूर : दोन टिप्पर आणि क्रुझर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट हद्दीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. भीमलिंगा, केंचव्वा, उमा, भाग्य, गोनीबसप्पा, अनिल आणि युवराज अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सर्व मृत होस्पेट येथील उक्कडकेरी येथील आहेत. टिप्परचा एक्सल कापल्याने …
Read More »दुसऱ्या हप्त्यासाठी बेळगावात शेतकऱ्यांचा चाबुक मोर्चा
कारखाने बंद पाडण्याचा राजू शेट्टींचा इशारा बेळगाव (वार्ता) : साखरेचे दर वाढल्याने गतवर्षीच्या ऊसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन चारशे रुपये, यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३८०० रुपये दर देण्यासह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून निदर्शने केली. संघटनेच्या मागण्या मान्य न …
Read More »हिंडलगा कारागृह उडवण्याची धमकी
बेळगाव : बेळगाव हिंडलगा कारागृह, बेंगळुरू कारागृह उडवून देण्याची धमकी देणारे फोन कारागृह विभागाचे उत्तर विभाग डीआयजीपी टी. पी. शेष यांना आल्याची माहिती मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हिंडलगा मध्यवर्ती कारागृह, बेळगाव, निवासी घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. कारागृह विभागाचे उत्तर विभाग डीआयजीपी टी. पी. शेष …
Read More »विद्यार्थ्यांच्या बस सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील पुलारकोप्पा व परिसरातील गावातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बस व्यवस्था करावी, या मागणीसाठी कर्नाटक भीमसेनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सोमवारी शहर, मध्यवर्ती बसस्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली. जिल्ह्यातील बैलहोंगल व खानापुर तालुक्यातील गावातून दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक शहरात ये-जा करतात. …
Read More »1 नोव्हेंबरच्या सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा
समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत आवाहन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील हे होते. 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावर प्रांतरचना झाली. त्यावेळी मुंबई प्रांतातील काही मराठी बहुल भाग हा कर्नाटकात डांबण्यात …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:00 वा.मराठा मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती सदस्यांनी वेळेवर हजर रहावे, असे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कळवले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होत आहे त्यामुळे या बैठकीत …
Read More »राजू शेट्टी यांच्या मोर्चात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर रहावे
बेळगाव : ऊस उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून ऊसाला एफआरपीसह योग्य भाव तसेच बेळगाव, खानापूर तालूका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, विकासासाठी पीकाऊ जमीनींचे भूसंपादन त्वरित थांबवून पडिक जमीनीतून विकास साधत अल्पभूधारक शेतकरी वाचवावा, शेतकऱ्यांची पीकं वाचवण्यासाठी त्यांच्या शेतातील कुपनलिकाना निरंतर विजपुरवठा करावा यासह इतर मुख्य मागण्यांसाठी सोमवार …
Read More »एंजल फाउंडेशनतर्फे 11 ऑक्टोबर रोजी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : कलागुणांना वाव मिळावा आणि खेळातून त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनावे हा हेतू घेऊन एंजल फाउंडेशनने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंगळागौर ही श्रावण महिन्यात साजरी करण्यात येते. मात्र श्रावणात उपवास सण उत्सव वार येत असल्याने महिलांना यातून म्हणावा तसा वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta