मुख्यमंत्री सिध्दरामय्या; कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव बंगळूर : समाजातील शांतता आणि सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे येण्याचे आवाहन केले. कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुलबर्गा येथील पोलीस परेड मैदानावर …
Read More »LOCAL NEWS
उमेदवारी फसवणूक प्रकरण; चैत्रा टोळीकडून रोख रकमेसह ३.८ कोटींचे सोने जप्त
बंगळूर : भाजपची उमेदवारी देण्याचे अमिष दाखवून व्यापारी गोविंद पुजारी यांची फसवणूक करणाऱ्या चैत्रा कुंदापूर टोळीकडून सीसीबी पोलिसांनी रोख रक्कमेसह ३.८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. १२ सप्टेंबर रोजी, चैत्र कुंदापुर टोळीला उडुपी आणि चिक्कमंगळूर येथे अटक करण्यात आली, त्यांना न्यायालयात हजर केले गेले आणि सीसीबी पोलिसांनी पुन्हा …
Read More »समाज निर्मितीमध्ये विश्वकर्मा समाजाचे मोठे योगदान
पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : विश्वकर्मा यांना सृष्टीचा पहिला निर्माता मानला गेला जातो. जगाच्या निर्मिती करणारा विश्वकर्मा यांना आद्य पुजले जाते. विश्वकर्मा जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी केली जाते. भगवान विश्वकर्मा हे विश्वाचे निर्माता आणि पहिले शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विश्वकर्मा समाजाचे अतिशय मोठे …
Read More »येळ्ळूर शाळेत सिरॅमिक ग्रीनबोर्डचे थाटात उद्घाटन
येळ्ळूर : गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत बेम्को हायड्रोलिक्स लिमिटेड उद्यमबाग बेळगाव या कंपनीकडून देणगीदाखल मिळालेल्या सिरॅमिक ग्रीनबोर्डचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी कंपनीचे सीनियर मॅनेजर श्री. अरविंद पालकर, कंपनी सेक्रेटरी सौ. अमृता तरळे, फायनान्स मॅनेजर श्री. राजशेखर लक्षट्टी, …
Read More »होन्नावरजवळील टोंका समुद्रकिनाऱ्यावर आढळला दीड टन वजनाचा मृत व्हेल मासा!
खानापूर : होन्नावरजवळील कासरकोड येथील टोंका बिचवर आज (रविवार) सकाळी तब्बल दीड टन वजनाचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वनविभाग आणि पशु संगोपन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची शवचिकित्सा करून मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू केला आहे. स्वच्छ आणि निसर्गरम्य इको बीच म्हणून टोंका …
Read More »जायंट्स सप्ताहाची शानदार सुरुवात
बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप (मेन)च्या वतीने दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी जायंट्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात पोहण्याच्या स्पर्धेने करण्यात आली. 17 ते 23 सप्टेंबर हा सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. आज सकाळी दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत गोवावेस येथील महापालिकेच्या स्विमिंग पुलावर चाललेल्या या स्पर्धेत विविध गटामध्ये स्पर्धकांनी …
Read More »पायोनियर बँकेची 117 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बँकेची 117 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी बँकेच्या भिमराव पोतदार सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टीकर हे होते तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह बाकीचे सर्व संचालक सहभागी होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मूल्या यांनी उपस्थित …
Read More »दांडेली येथील एका खाजगी शाळेत मुलींचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न?
दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील एका खाजगी शाळेत विद्यार्थिनींच्या गटाने एकत्रितपणे हाताची नस कापून घेऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. 9वी आणि 10वीत शिकणाऱ्या 9 विद्यार्थिनींच्या डाव्या हाताच्या खालच्या भागात धारदार शास्त्राने जखम झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या हातावर 10-15 जखमा आढळून आल्या. त्या …
Read More »सार्वजनिक शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे कराटेपटू अत्यवस्थ
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे, जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कराटे स्पर्धेत अधिकाऱ्यांच्या आणि आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे खेळाडू अस्वस्थ झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सार्वजनिक शिक्षण विभागाच्या वतीने शनिवारी तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र खेळाडू आणि प्रशिक्षकांना योग्य आहार, पाणी आणि वैद्यकीय उपचार …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरती संग्रहाचे प्रकाशन
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आरती संग्रह तयार करण्यात आला. त्याचे प्रकाशन आज छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये करण्यात आले. प्रथम महाराजांच्या मूर्तीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि समितीचे युवानेते मदन बामणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीमूर्तीचे पूजन प्रकाश मरगाळे व अंकुश केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले, त्यानंतर आरती संग्रहाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta