बेळगाव : बेळगाव शहरात येत्या शनिवारी काढण्यात येणारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक शांततेत उत्साहात पार पाडण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला. बेळगावात आज शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »LOCAL NEWS
‘शांताई’ मध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन भक्तीभावात
बेळगाव : शहरातील शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजन कार्यक्रम नुकताच मोठ्या भक्तीभावाने उत्साहात पार पडला. बेळगाव शहरातील आराधना संस्थेचे अध्यक्ष सुनील चौगुले यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थांचे वंशज श्री श्री निलेश महाराज आणि इतर महाराजांच्या उपस्थितीत काल बुधवारी या पादुका पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांताई वृद्धाश्रमा …
Read More »ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने पाच दुचाकींना उडवले
बेळगाव : ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींना उडवल्याची घटना बुधवारी (दि. २४) रात्री नऊच्या सुमारास शनिवार खुटावर घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चन्नम्मा चौकातून शनिवार खुटाकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. …
Read More »डीजे मुक्त चित्ररथ मिरवणूक साजरी होणार : पोलीस विभाग – ‘मध्यवर्ती’च्या बैठकीत निर्णय
बेळगाव : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या शतकोत्तर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात आज कॉलेज रोड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक तयारी संदर्भात तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त एस. टी. शेखर, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, उपाध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी एन. जयराम यांची नियुक्ती
बेळगाव : बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे अध्यक्ष, आयएएस अधिकारी एन. जयराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. एन. जयराम यांचे बेळगावशी अतूट नाते असून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी चार वर्षे सेवा पार पाडली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन चांगली …
Read More »संवेदनशील भागात शिवजयंती मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर; आयुक्तालयात बैठक
बेळगाव : शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. मिरवणुकीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. संवेदनशील भागातील व मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांन दिले आहे. तसेच पांरपारिक वाद्यांनाच …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवारी
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार दिनांक 26 रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओवरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीमध्ये एक जून 1986 मधील कन्नड सक्तीतील हुतात्म्यांना अभिवादन तसेच विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित …
Read More »येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्यावतीने आजारांविषयी जनजागृती
बेळगाव : नुकताच दिनांक 16 मे रोजी राष्ट्रिय डेंग्यू दिवस झाला आणि आता पावसाळ्याला सुरूवात होईल या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्या वतीने येळ्ळूर येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया आजार हमखास बळावतात. लोकांमध्ये या आजाराविषयी जागृती हाेण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष …
Read More »सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नामुळे नाला सफाई सुरू
बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील तुंबलेल्या नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाला गेला काही महिन्यांपासून स्वच्छते अभावी तुंबला होता. तुंबलेल्या या नाल्यामुळे पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील तिघांचे यूपीएससी परीक्षेत यश
बेळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा रोवला आहे. सौंदत्ती तालुक्यातील तल्लूरच्या श्रृती गट्टीने 362 वे स्थान मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. कागवाड तालुक्यातील उगारच्या आदिनाथ तमदडीने 566 वे व चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडीच्या अक्षय पाटीलने 746 वे स्थान मिळवले. श्रुतीने पाचव्या प्रयत्नात हे यश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta