Friday , October 18 2024
Breaking News

LOCAL NEWS

एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन

बेळगाव (वार्ता) : म. ए. समितीचे माजी नगरसेवक आणि एपीएमसी माजी अध्यक्ष, कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रात्री साडे नऊ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …

Read More »

स्वामी विवेकानंद हे भारतातील पहिले समाजवादी : प्राचार्य डॉ. आनंद मेणसे

प्रगतिशील लेखक संघ आणि साम्यवादी परिवारतर्फे आयोजन : 159 वी स्वामी विवेकानंद जयंती साजरी बेळगांव (प्रा. एन. एन. शिंदे) : पारंपारिक विचारांना फाटा देऊन सामाजिक आणि वैज्ञानिक दूरदृष्टीकोणाचा पुरस्कार केला. भाषा ही माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते; बंगाली, इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांवरील असामान्य प्रभूत्वामुळे जगावर प्रभाव स्वामी विवेकानंद यांनी …

Read More »

सुवर्ण विधानसौध समोर सामूहिक सूर्यनमस्कार

बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव सुवर्ण विधानसौधसमोर आज शुक्रवारी आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सदर उपक्रमाचे उद्घाटन बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते झाले. …

Read More »

खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात डांबण्यात आलेल्या शिवभक्तांची मुक्तता करावी

शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी बेळगाव (वार्ता) : खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात डांबण्यात आलेल्या शिवभक्तांची मुक्तता करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान केल्यानंतर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमधील …

Read More »

राजकीय मेळावा, निषेध, धरणे आंदोलनास ब्रेक

पदयात्राविरोधी याचिका निकालात, एसओपी पालनाचे हायकोर्टाचे निर्देश बंगळूर (वार्ता) : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 14) राज्य सरकारला कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीची (एसओपी) काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जोपर्यंत मार्गसूची कार्यरत आहे, तोवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोणताही राजकीय मेळावा किंवा निषेध किंवा धरणे यांना परवानगी देऊ …

Read More »

राज्यात लॉकडाऊन लावणार नाही : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर

बेंगळुर : लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. बेंगळुरात आज पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही हे सिद्ध झाले आहे. याआधी दोनदा लॉकडाऊन लावल्याने जनतेला मोठा त्रास झाला …

Read More »

कोरोनाचे नियम पाळून हुतात्मा दिन; प्रशासनाची परवानगी

बेळगाव (वार्ता) : कोरोनाचे नियम पाळून 17 जानेवारी रोजी सकाळी हुतात्मा चौकात हुतात्मा दिन पाळावा अश्या सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केल्या आहेत. शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळाने हिरेमठ यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

शाळांच्या निर्णयाचा फेरविचार करा

बेळगाव सिटीझन कौन्सिलच्यावतीने मागणी बेळगाव (वार्ता) : कोरोना आणि ओमिक्रॉनचा वाढता कहर तसेच सध्याचे थंडीचे मुलांच्या आजारांना निमंत्रण देणारे वातावरण याचा गांभीर्याने विचार करून बेंगलोरप्रमाणे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील शाळा येत्या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवाव्यात. यासाठी येत्या 17 जानेवारी रोजी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्ग सुरू करण्याच्या आपल्या आदेशाचा पुनर्विचार …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

बेळगाव (वार्ता) : मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासणार्‍या समाजकंटकांच्या सत्काराचा निषेध करण्याबरोबरच येत्या 17 जानेवारी रोजी कोरोनाचे नियमासह हुतात्मा दिन गांभीर्याने आचरणात आणून कडकडीत हरताळ पाळण्याचा ठराव बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. शहरातील खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे आज दुपारी …

Read More »

काँग्रेसची अखेर मेकदाटू पदयात्रेतून माघार

न्यायालयाच्या निर्देशाचे पालन, कोविड संसर्गाचे कारण बंगळूर (वार्ता) : जनतेच्या तिखट टीका आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत काँग्रेसने गुरुवारी मेकेदाटू पदयात्रा अखेर मागे घेती. बुधवारी संध्याकाळी पदयात्रेवर बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला होता. बुधवारी संध्याकाळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोघेही बंगळुरला परतल्याने …

Read More »