Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

बेळगावचे नूतन एसपी भीमाशंकर गुळेद यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी भीमाशंकर गुळेद यांनी आज पदभार स्वीकारला. भीमाशंकर गुळेद यांनी बेळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आज पदभार स्वीकारला. मावळते एसपी डॉ. संजीव पाटील यांनी पदभार सोपवला. प्रसामाध्यमांशी बोलताना नूतन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, आज मी …

Read More »

झाडशहापूरजवळ अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

  बेळगाव : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील झाडशहापूरजवळ आज दुपारी 2 च्या दरम्यान दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव भरत बिदरभावी असून झाडशहापूर येथील रहिवासी आहे. तो कामावरून घरी चालला असता वेगवान चाललेल्या गाडीने धडक दिली. या धडकेत भरतचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी

  बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक रविवार ता. 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष – रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष – रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस – महादेव पाटील आणि …

Read More »

जेडीएस- भाजप युतीला अमित शहांचा ग्रीन सिग्नल?

  बेंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यात जेडीएस सोबत युती करत असल्याच्या चर्चेला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पडदा टाकला. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी पुष्टी केली की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाला आधीच ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. …

Read More »

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

  बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी फौंड्री क्लस्टर येथे संपन्न झाला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन अध्यक्षपदी सी. सी. होंडदकट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, कीथ मचाडो, सचिव राजेंद्र मुतगेकर, खजिनदार रोहित कपाडिया यांची 2023-24 या वर्षाकरिता …

Read More »

जिल्हा पंचायत, तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना

  बेळगाव तालुका पंचायतचे १० मतदार संघ घटवले बेळगाव : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक पंचायत राज मतदर संघ निर्णय आयोगाने विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या निश्चित केली असून, त्याची यादी प्रकाशित केली आहे. …

Read More »

सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू

  अथणी : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचा काल रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला. अथणी तालुक्यातील नदि-इंगळगाव गावचे सैनिक असलेले लक्ष्मण घोरपडे हे सुटीच्यानिमित्त गावी आले होते. त्यातच त्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. शहीद जवानाच्या पार्थिवावर शुक्रवारी …

Read More »

धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत वाढविली

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची जुनी असलेली मागणी पूर्ण झालेली असून धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत वाढविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले असल्याची माहिती राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांनी दिली. खासदार ईराण्णा कडाडी यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रेल्वे क्रमांक 17302 बेळगावहून सायंकाळी 7:45 वाजता …

Read More »

बलिदानातून उभारलेला भारत वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची गरज

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; समाजात फूट पाडण्याचे काम होत असल्याचा आरोप बंगळूर : प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये परस्पर द्वेषाची पेरणी करून जाती-धर्माच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले जाते. याविरुद्ध एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. बलिदानातून उभारलेला भारत वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची …

Read More »

गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी स्थगित नाही : लक्ष्मी हेब्बाळकर

  नोंदणी स्थगितच्या पोस्टने गोंधळ बंगळूर : गृहलक्ष्मी योजनेची नवीन नोंदणी थांबलेली नाही, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विभागाच्या वेबसाइटवर केलेल्या घोषणेची आपल्याला माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या. महिला व बालकल्याण विभागाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे की गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन …

Read More »