बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी नुकत्याच पार पडलेल्या 2 ऱ्या कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 या स्पर्धेत चांगली चमक दाखवत चार पदकांची कमाई केली. 2 री कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 ही स्पर्धा गेल्या 18 ते 20 ऑगस्ट रोजी बेंगळुरू …
Read More »LOCAL NEWS
दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले
बेळगाव : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र पळविले आहे. बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी रानडे रोड, हिंदवाडी येथे ही घटना घडली आहे. सायंकाळी टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. अश्विनी विजय पावले (वय ३८) रा. पांगुळ गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात …
Read More »कावेरी, म्हादईप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट
बैठकीत निर्धार; राज्याच्या हिताच्या विषयात राजकारण नसल्याचा निर्वाळा बंगळूर : कावेरी, म्हादई, मेकेदाटू आणि अप्पर कृष्णा पाणी तंटा वि।या संबंधात केंद्र सरकारकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. सर्व पक्षांचे शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. …
Read More »मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी
बेळगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवार दि. 27 रोजी अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील या दोन गटात निवडणूक होणार आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेली बोलणी आज फिस्कटली आहे. अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी वेगवेगळे पॅनेल तयार केले. तानाजी …
Read More »राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदांत मिसाळे याला कांस्यपदक
बेळगाव : स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा जलतरणपटू वेदांत मिसाळे याने भुवनेश्वर (ओडीसा) येथे नुकत्याच पार पडलेल्या 39 व्या उपकनिष्ठ आणि 49 व्या कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्य स्पर्धा -2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवत कांस्यपदक पटकाविले आहे. भारतीय जलतरण महासंघाच्या मान्यतेने ओडिसा राज्य जलतरण संघटनेने गेल्या 16 ते 20 …
Read More »मंडोळी हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी विषयावर कार्यशाळा संपन्न
क्रांती फाउंडेशन बेळगाव व भारतीय संस्कृती फाउंडेशनचा अप्रतिम उपक्रम बेळगाव : मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी मंडळ हायस्कूलमध्ये भारतीय संस्कृती फाउंडेशन बेळगाव व क्रांती फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त माध्यमातून मंडोळी हायस्कूल येथे व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी, बाल हक्क कायदे, त्याचसोबत विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक जीवन कसे यशस्वी करावे या …
Read More »गणेशोत्सवाच्या 15 दिवस अगोदर “एक खिडकी” सुविधा उपलब्ध करू
पोलीस आयुक्त डॉ. एस. एन. सिद्धरामप्पा यांची माहिती बेळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना येत्या गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या विविध खात्याची लेखी परवानगी मिळणे सोईस्कर होण्यासाठी गणेशोत्सवाच्या 15 दिवस अगोदर “एक खिडकी” सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन देण्यासोबत गणेशोत्सव शांततेत पार पाडवा यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांची तसेच प्रत्येक …
Read More »कंत्राटदारावर दुबार रस्ता डागडुजीची नामुष्की!
बेळगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहराच्या दक्षिण भागात तथाकथित विकासकामांचा सपाटा लावण्यात आला होता पण हा विकास पहिल्या पावसातच वाहून गेल्यामुळे कंत्राटदारावर पुन्हा एकदा डांबरीकरण करण्याची वेळ आली आहे. अनगोळ- वडगाव रस्त्याची मागील आठ वर्षांपासून दुरवस्था झाली होती. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनगोळ- वडगाव …
Read More »25 ते 27 ऑगस्टदरम्यान शहरात पाणीपुरवठा खंडित!
बेळगाव : शुक्रवार दि. 25 ऑगस्ट ते रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत शहरात पाणीपुरवठा खंडित होणार आहे. हिडकल डॅम येथील विद्युत केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे हेस्कॉमकडून 10 एमव्हीए 110/33 केवी पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात येणार आहे, असे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी …
Read More »विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित प्रांतीय व क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा इंग्रजी शाळेने विजेतेपद पटकावित विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघपात्र ठरले आहेत. या स्पर्धेत प्रांतीय स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने बालभारती गुलबर्गा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta