Friday , October 18 2024
Breaking News

LOCAL NEWS

दोषी विमा कंपन्यांवर कारवाई करू : कृषी मंत्री बी. सी. पाटील

हुबळी : पीक विम्याची फसवणूक केली जाणार नाही. फसवणूक करणार्‍या कंपन्यांना ताकीद देण्यात आली असून ज्या कंपन्यांवर आरोप करण्यात आले आहेत, अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी दिले आहे. हुबळी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जाबद्दल नोंदी …

Read More »

येत्या 19 डिसेंबरला होणार सौंदत्तीची शाकंभरी यात्रा

बेळगाव : सौंदत्ती श्री यल्लमा देवीची शाकंभरी यात्रा येत्या 19 डिसेंबरला होणार असून दोन वर्षांनी यंदा ही यात्रा होणार असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भक्तांना यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे. गेल्या दोन वर्षापासून शाकंभरी यात्रेत कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांना यात्रेत सहभागी होता आलेले नाही. दरवर्षी …

Read More »

आम. रमेश जारकीहोळी यांचे डी. के. शिवकुमार यांना चॅलेंज!

बेळगाव : मी कोण आणि माझ्यासमोर डी. के. शिवकुमार कोण लागून गेलेत? हवा तर खुला मुकाबला होऊ दे. कनकपुरच्या त्या पठ्ठ्याला निवडणूक निकाला दिवशी मी कोण आहे ते दाखवून देतो, असे ओपन चॅलेंज माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी डीकेशींना आज दिले. विधानपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे …

Read More »

विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआरची सक्ती : डॉ. सुधाकर

बेंगळुरू : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणार्‍या प्रवाशांची सक्तीने आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आज बुधवारी बेंगलोर विमानतळाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी …

Read More »

फ्रंटलाइन कामगारांना कोविड बूस्टर देण्यासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई राज्यातील फ्रंटलाईन कामगारांसाठी कोविड बुस्टर डोस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी बुधवारी सांगितले की, केंद्र सरकारचे मत याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आरोग्य आणि आघाडीच्या कामगारांना अँटी-कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याच्या मुद्द्यावर झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची स्थिती जाणून घेऊन राज्यातील तज्ञांनी अनुकूलता व्यक्त केली असल्याने …

Read More »

सर्व देशातील प्रवाशांची कर्नाटकात चाचणी, क्वॉरंटाईन

तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय : रोज 2500 विदेशी प्रवाशी बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सूचनेनुसार, राज्य कर्नाटकात येणार्‍या सर्व देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-19 चाचणी करेल. याआधी, ज्या देशांत ओमिक्रॉन व्हेरियंट सापडला आहे अशा देशांतील प्रवाशांसाठी अनिवार्य आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. …

Read More »

शहीद जवानाच्या कुटुंबियांचे आंदोलन!

बेळगाव : लष्करात सेवा बजावणार्‍या शहीद जवानाच्या कुटुंबाला राज्य सरकारने दोन एकर जमीन दिली आहे. मात्र त्याचा फायदा घेण्यासाठी आम्हाला एनओसीची गरज आहे. जिल्ह्यातील तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्षभरापासून आमचा छळ करत असल्याचा आरोप शहीद जवानाच्या कुटुंबियांनी केला आहे. सौंदलगा गावचे संजय वसंतराव देसाई भारतीय सैन्यात श्रीलंकेत सेवा बजावीत …

Read More »

बेपत्ता मुलगा सापडला सुखरूप चिखलात!

विजापूर : घरातून बेपत्ता झालेला मुलगा दुसर्‍या दिवशी चिखलात पण सुखरूप सापडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावात घडली. मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावातील संतोष मादर हा बालक कालपासून घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे चिंतेत होते. संतोष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ …

Read More »

गरीब विद्यार्थ्यांचे 19.75 लाख रुपये शैक्षणिक शुल्क सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने भरले!

बेळगाव : बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन फॉर नीडी या सेवाभावी शाखेच्या माध्यमातून शहरातील 166 गरीब गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एकूण 19 लाख 75 हजार रुपये इतके शैक्षणिक शुल्क भरण्यात येणार असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आदित्य मिल्क आणि आदित्य आईस्क्रीम कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम …

Read More »

चोर्ला रस्ता तातडीने दुरुस्त करावा

बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे निवेदन बेळगाव (वार्ता) : गोव्याकडे जाणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून वाताहत झालेल्या या रस्त्यामुळे बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे …

Read More »