बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. श्री. सुधीर चव्हाण यांचा सत्कार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. ऍड. चव्हाण यांनी आजवर समितीच्या प्रत्येक लढ्यात आपली कायदेशीर भूमिका चोकपणे बजावली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असो सामान्य जनतेचा प्रश्न असो, कौटुंबिक प्रश्न असो …
Read More »LOCAL NEWS
सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा
बेळगाव : बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी काल सोमवारी पहाटे महापालिकेच्या घंटागाडीतून शहरातील विविध भागात पाहणी दौरा केला. त्यानंतर आज मंगळवारी शहर दक्षिण भागातील नाला व स्वच्छता कामांची पाहणी केली. आयुक्त दुडगुंटी यांनी काल अचानकपणे पहाटेच्या वेळी शहराचा दौरा करून स्वच्छता कामाची पाहणी केली होती. आयुक्तांच्या या आक्रमक …
Read More »स्कूल बस उलटली; सुदैवाने जिवीतहानी टळली
सांवगाव गावाजवळ घटना बेळगाव : शाळकरी मुलांना घेऊन जाणारी अंगडी इन्स्टिट्यूटची (क्र. केए 22 सी 7495) स्कूल बस उलटली मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी घडली नाही. सदर अपघातात बसमधील दोन विद्यार्थी, एक महिला जखमी तर अन्य किरकोळ जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 8.15 च्या सुमारास सांवगाव जवळ सावगाव बेनकनहळ्ळी रोडवर …
Read More »उडुपी महाविद्यालयातील व्हिडीओ चित्रीकरण प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार
बंगळुरू : उडुपी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या शौचालयामधील व्हिडिओ चित्रीकरणाचे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण संवेदनशील असल्याने पुढील तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे. उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले …
Read More »संभाजी भिडे वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या राष्ट्रपुरुषांच्याविषयी अत्यंत हीन पातळीवरुन लांच्छनास्पद वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य राज्यघटनेचा अवमान करणारे आणि देशविरोधी …
Read More »गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून परवानगी द्यावी : मंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना
बेळगाव : बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी करावी, तसेच उत्सव मंडळांना विनाविलंब एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या सभागृहात आज सोमवारी (७ ऑगस्ट) झालेल्या प्राथमिक सभेच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी पुढे …
Read More »अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्यावतीने ऍड. सुधीर चव्हाण यांचा सत्कार
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेचे जिल्हा अध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व शिवसंदेश भारत समूहाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसंत संजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते डी. बी. पाटील, परिषदेचे कर्नाटक …
Read More »बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य : मंत्री सतीश जारकीहोळी
250 कोटी खर्चाचे 220 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन बेळगाव : बेळगाव शहराचा विकास झपाट्याने होत आहे. उद्योग, गृहनिर्माण यासह सर्वच बाबतीत विकास होत आहे. यासह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शहरातील मच्छे …
Read More »गणेशोत्सवाच्या दीड महिना आधीच श्रीमूर्ती विसर्जन व्यवस्थेच्या हालचाली
बेळगाव : पुढील महिन्यात 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने तब्बल दीड महिना आधीच श्रीमूर्ती विसर्जना संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर शोभा सोमणाचे तसेच काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी आज सोमवारी दक्षिण भागातील विविध ठिकाणच्या श्रीमूर्ती विसर्जन तलावांना …
Read More »कंग्राळी बुद्रुक कलमेश्वर सोसायटीची सभा खेळीमेळीत; सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव
बेळगाव : कंग्राळी बुद्रुक येथील श्री कलमेश्वर को. ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा व सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव व मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी संस्थेच्या सभागृहामध्ये पार पडला. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष तानाजी पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष हुद्दार, संचालक जी. वाय. अष्टेकर, विजय पावशे, नाथाजी पाटील, संतोष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta