Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

गीता गवळी हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या!

गवळी समाजासह विविध संघटनांची बेळगावात तीव्र निदर्शने बेळगाव : मालमत्तेच्या वादातून हत्या झालेल्या गीता गवळी यांच्या हत्येतील आरोपींना अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बेळगावात गवळी समाजासह विविध संघटनांनी तीव्र निदर्शने केली. तसेच पीडित कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. मंगळवारी टिळकवाडी गवळी गल्ली येथील रहिवासी गीता …

Read More »

जनगणना सर्वेक्षणात पोटजात ‘कुणबी’ अशी नोंद करा; सकल मराठा समाजाच्या बैठकीत भूमिका

  जनगणना सर्वेक्षणादरम्यान मराठा समाजाने जागरूक रहावे बेळगाव : 22 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण होणार आहे. जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाने कोणत्या पद्धतीने नोंदी कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाजाने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन जत्तीमठ येथे केले होते. या बैठकीमध्ये धर्म: हिंदू, जात:मराठा, पोटजात:कुणबी, मातृभाषा:मराठी अशा …

Read More »

वेदांत सोसायटीला १४ लाखांचा निव्वळ नफा; १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : वडगाव- शहापूर रोड येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांच्या विश्वासार्हतेच्या बळावर सोसायटीला यावर्षी १४ लाख ९५१ रुपयांचा निव्वळ नफा झाला, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन संदीप खन्नुकर यांनी यावेळी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित …

Read More »

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि., उचगाव सोसायटीच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण

  उचगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि उचगाव या सोसायटीच्या वतीने डॉ. संध्या देशपांडे यांना साहित्य भूषण पुरस्कार, ह. भ. प. प्रभाकर सांबरेकर यांना सेवा भूषण पुरस्कार, मेहबूब एम् मुल्तानी यांना सेवा भूषण पुरस्कार, श्रेया भोमाणा पोटे हिला क्रीडा भूषण पुरस्कार, बाळकृष्ण रामचंद्र देसाई यांना शिक्षक भूषण पुरस्कार …

Read More »

डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू : एस. एम. देशमुख

  छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मोठा प्रतिसाद मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक उलाढाल 66 कोटीवर

  25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा : चेअरमन डी जी पाटील यांची माहिती येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी जी पाटील होते. प्रारंभी सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »

‘जय किसान भाजी मार्केट’चे ‘ट्रेडिंग लायसन्स’ रद्द

  बेळगाव : बेळगाव येथील ‘जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन’ला कृषी पणन विभागाच्या निर्देशकांनी मोठा धक्का दिला आहे. परवान्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तसेच शेतकरी हिताचे रक्षण करण्यात अपयश आल्यामुळे ‘एपीएमसी’च्या निर्देशकांनी लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. बेळगावमधील ‘जय किसान’ या खासगी भाजी मार्केटला कृषी पणन विभागाने हा मोठा …

Read More »

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज नवीन शैक्षणिक वर्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्राध्यापक डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षाची रूपरेषा समजावून सांगितली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, नियम, कष्ट व …

Read More »

शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे शिवरायांचे नांव बदलण्यास श्रीराम सेना हिंदुस्थानचा विरोध

  बेळगाव : बेंगलोर येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज हे नांव बदलून सेंट मेरी मेट्रो स्टेशन असे करण्याच्या प्रस्तावाला श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचा तीव्र आक्षेप आहे. तेंव्हा नाव बदलण्याऐवजी त्या स्टेशनला “छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन” असे अधिकृत नाव घोषित करावे, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान आणि हमारा …

Read More »

मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या कर्नाटक अध्यक्षपदी अतुल शिरोळे

  बेळगाव : मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या कर्नाटक राज्याध्यक्ष पदी बेळगावचे सुपुत्र पैलवान अतुल शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे. मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून बेळगाव सहा कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी कुस्ती व अनेक क्रीडा प्रकारच्या विषयी काम केले जाणार आहे. बेळगाव मधील भावी खेळाडूंना या संघटनेच्या माध्यमातून मदत मिळणार …

Read More »