बेळगाव : येळ्ळूर गावातील पाटील गल्ली येथील शिवाजी महाराजांची मूर्ती जीर्ण झाल्याने त्या जागी नवीन अश्वारूढ मूर्ती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवानंद मठपती यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील पाटील वाडीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार्या छत्रपती शिवरायांच्या नव्या अश्वारूढ मूर्तीची शहरातील शिवाजी उद्यानापासून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माहिती देताना …
Read More »LOCAL NEWS
येळ्ळूर येथे राष्ट्रीय ग्रामीण उद्योगखात्री अंतर्गत रोजगार कामांना सुरुवात
बेळगाव : येळ्ळूर येथे आजपासून राष्ट्रीय ग्रामीण उद्योगखात्री अंतर्गत रोजगार कामांना सुरुवात आज येळ्ळूर ग्राम पंचायतकडून सुळगे रोड येळ्ळूर येथे रोजगार कामांना सुरुवात करण्यात आली. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या हस्ते पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच सर्व 150 रोजगारांना चॉकलेट देऊन कामाला सुरुवात …
Read More »बाकमुर रस्ता तात्काळ दुरुस्त करा; बाकमुर ग्रामस्थांचे निवेदन
बेळगाव : बाकमुर रस्ता तात्काळ दुरुस्त करून बस सेवा पूर्ववत व सुरळीत करावी, अशी मागणी बाकमुर परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. बेळगाव जवळील बाकमुर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन या रस्त्याने ये-जा …
Read More »आमची प्राथमिकता केवळ विकासाला, ‘व्होट बँके’ला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी; यादगीर जिल्ह्यात विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी भाजप सरकारचे प्राधान्य केवळ विकासाला असल्याचे प्रतिपादन केले. कर्नाटकावर राज्य केलेल्या इतर पक्षांच्या सरकारांनी केवळ “व्होट बँक”चे राजकारण केल्याचा आरोप करून राज्यातील काही प्रदेशांच्या मागासलेपणासाठी त्यांच्यावर निशाणा साधला. यादगीर जिल्ह्यातील कोडेकल येथे राष्ट्रीय …
Read More »शारदा हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात प्रारंभ!
बेळगाव : हालगा येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित शारदा हायस्कूलमध्ये 39 व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. संस्थेचे चेअरमन श्री. विजय अर्जुन लोहार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. वडगाव येथील मंगाई सौहार्द सोसायटी नियमितचे चेअरमन श्री. सतीश शिवाजी पाटील प्रमुख …
Read More »बेळगावात 21 ते 24 जानेवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव!
बेळगाव : 21 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान बेळगावकरांना आंतराष्ट्रीय पतंग महोत्सवाची अनुभूती घेता येणार आहे. रंगीबेरंगी व आकर्षक पतंगांनी आकाश सजणार आहे. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने बेळगाव शहरातील मालिनी सिटी मैदानावर 11 व्या भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार …
Read More »अथणी येथे वीज केंद्रात भीषण आग
अथणी : येथील 110 केव्ही वीज केंद्रात भीषण आग लागली आहे. सदर आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरून संपूर्ण वीज केंद्राला आगीने वेढले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अथणी शहरातील विजापूर रोडला जोडलेल्या वीज केंद्रात सकाळी 09.15 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात …
Read More »विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यावश्यक : चित्रपट निर्माते-अभिनेते चरणराज
बेळगाव : विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगायचे असेल आणि चांगले नागरिक बनायचे असेल तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते चरणराज यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या डी. वाय.चौगुले भरतेश हायस्कूलच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांना बालवयातच दर्जेदार शिक्षण मिळाले तर …
Read More »बालहक्क आणि संरक्षणासंदर्भात के. नागनगौडा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : लैंगिक हिंसा, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी, भीक मागणे यासह विविध कायदेशीर संघर्षांमधील मुलांची ओळख पटवून त्यांना मुख्यप्रवाहात आणणे तसेच मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भात कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के. नागनगौडा यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात बाल न्यायालय कायदा, आर.टी.ई., बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून …
Read More »पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एक ठार
बेळगाव : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 आहे. बेळगाव उज्वल नगर जवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला. पुण्याहून बेंगळुरूच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात व्यक्तीने धडक दिल्याची माहिती स्थानिकांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta