Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मनीकांत बुकिटगार याची कर्नाटक राज्य उपकर्णधारपदी निवड

  बेळगाव (प्रतिनिधी) :  बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि विजया क्रिकेट अकॅडमी व हुबळी क्रिकेट अकादमी यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनीकांत शिवानंद बुकिटगार याची कर्नाटक संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. विनू मंकड करंडक देहरादून येथे ९ ते १७ ऑक्टोबर यादरम्यान खेळवण्यात येणार आहे. मनीकांत याने गतवर्षी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठांच्या …

Read More »

राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

  बेळगाव : राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी राज्य सरकारने बदल्यांचा आदेश जारी केला असून यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांची कर्नाटक लोकायुक्त विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर संतोषकुमार डी. यांची …

Read More »

सरकारी आणि अनुदानित शाळांची दसऱ्याची सुट्टी 18 ऑक्टोबरपर्यंत वाढविली

  बंगळूर : राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांना दसऱ्याची सुट्टी आता १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कायमस्वरूपी मागासवर्ग आयोगातर्फे राज्यात सुरू असलेले सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण काही ठिकाणी अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील …

Read More »