
महांतेशनगर : महांतेशनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक गटार असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली होती. या गटारामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेष करून रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात गटार न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक होती. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गटाराची दुरुस्तीआणि गटाराभोवती संरक्षक कुंपण लावून संभाव्य अपघात टाळण्याचा प्रयत्न केला आहे. महांतेशनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक गटारामुळे वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला होता. धोकादायक परिस्थितीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, राजू टकाकर, शशिकांत अंबेवाडीकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी उघडे गटार तातडीने सुरक्षित केले. गटाराभोवती अडथळे उभारले व आवश्यक इशारा चिन्हे लावून संभाव्य अपघात टाळण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाय होईपर्यंत नागरिकांच्या जीविताची सुरक्षा महत्त्वाची आहे, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली. संबंधित विभागाने याठिकाणी त्वरित झाकण बसवून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta