बेळगाव- कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे कर्नाटक सरकारने संकटात सापडलेल्या गरीब व श्रमिकांना 1250 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजमध्ये पिग्मी कलेक्टर्सचा समावेश नाही.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने अर्थिक संस्थांची पिग्मी कलेक्शन ही बंद आहे. पिग्मी कलेक्टर्सना त्यांच्या कलेक्शनवरच संस्थाकडून कमिशन दिले जाते पण कलेक्शन्स बंद असल्याने पिग्मी कलेक्टर्स आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यासाठी सरकारने पिग्मी कलेक्टरनासुद्धा विशेष पॅकेजद्वारा आर्थिक मदत करावी असे निवेदन बेळगावातील सहकारी सोसायटी यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. मर्कंटाईल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे व आधार सोसायटीचे संस्थापक अनंत लाड यांनी जिल्हाधिकारी श्री. हिरेमठ यांना गुरुवारी हे निवेदन सुरू केले. या निवेदनावर मर्कंटाईल, आधार, आदर्श, समर्थ, अनमोल, नवहिंद, सह्याद्री, कॅपिटल वन व गणेश सोसायटीच्या चेअरमनच्या सह्या आहेत. आपण हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवतो असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.