चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : अडकुर (ता. चंदगड) हे चंदगड तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठ असणारे गाव असून आजूबाजूंच्या वाड्यामध्ये लोक वस्ती वाढत आहे. तरी या सर्व वाड्या वस्त्यांना तसेच गाव संलग्न वस्तीना शेती पंप लाईट न देता विल्लेज लाईट मिळावी व सुरळीत विद्युत पुरवठा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन विद्युत मंडळचे अधिकारी हडपद यांना देण्यात आले.
तसेच ही लाईन हरिजन वाडा ते ख्रिचन स्मशानभूमी ते पाटीलवाडा असा रोड संलग्न विद्युत पुरवठा मिळावा. त्यातून लोकांची गैरसोय होऊ नये अशी मागणी केली आहे.
यावेळी मा. सभापती व चंदगड पंचायत समितीचे सदस्य बबनराव देसाई, शिवराज देसाई, संदीप देसाई, अभिजित देसाई, संजय देसाई, सुरेंद्र आर्दाळकर आदी उपस्थित होते. यापुढेही समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाला सहकार्य होण्यास निश्चितच मदत होईल.