चंदगड (प्रतिनिधी) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांना समाजसेवेचा आंतरराज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी शिनोळी बुद्रुक येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.
सरपंच नितीन नारायण पाटील हे उच्चशिक्षित असून गावचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी पहिल्यांदा शासनाच्या जीआर नुसार कर वसुली करून तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून कोट्यावधी रुपये वसूल करून त्यांनी केलेल्या गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, गावातील रिंग रोड रस्ता, गावातील अंतर्गत सर्व रस्ते व पथदीप यांची सोय केलेली आहे. औद्योगिक वसाहतीत असल्याने लॉकडाऊन कालावधीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजही त्यांच्यातील धडपड व बाहेरगावच्या कामगार वर्गाला दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी कार्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याच बरोबर गावातील हायस्कूलला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व दहावी परीक्षेत अनुक्रमे दरवर्षी सृष्टी ट्रेडर्सकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मृतिचिन्ह व बक्षिसे दिली जातात तसेच मयत झालेल्या व्यक्तीला सरणासाठी मोफत लाकडे आणि दरवर्षी राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला गावातील दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान स्वतःला असून सुद्धा अशा व्यक्तींच्या हस्ते ते करतात त्याचबरोबर गावातील सांस्कृतिक कामांमध्ये आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा यांचा आयोजन ते करतात या सर्व त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी सामाजिक सेवेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे .
रविवार दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी अरविंद घट्टी फार्म हाऊस, केएलई कॉलेज समोर जोडकुरळी चिकोडी येथे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप मेडल, विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व म्हैसूर फेटा बांधून प्रदान करण्यात येणार आहे.
या फाउंडेशनची स्थापना बेळगाव चे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, ॲड. सुनील शिंदे, उद्योगपती सुरेशदादा पाटील व अभियंते मनोहर वड्डर यांनी केलेली आहे.
समाजसेवक आण्णा हजारे, पाटोदाचे भास्कराव पेरे – पाटील व हिरवे बाजारचे पोपटराव पवार यांच्या धरतीवर ग्राम विकास करण्याचा संकल्प आहे.
या आंतरराज्य पुरस्कारामुळे शिनोळी बु. गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे सरपंच नितिन पाटील यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.