आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय
लखनौ : अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. आत्महत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत आढळला असून पोलिसांना खोलीचे दरवाजेही चारही बाजूंनी बंद असल्याचे आढळले आहे, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. महंत नरेंद्र गिरी आत्महत्या करूच शकत नाही असं त्यांच्या अनुयायांचं म्हणणं असून सीबीआय तपासाची मागणी केली आहे.
निरंजनी आखाड्यातून निष्कासित योगगुरु आनंद गिरी आणि अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मंदिर-मठ यांच्या जागेवरून वाद शिगेला पोहोचला होता. स्वामी आनंद गिरी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवून वादाची माहिती दिली होती. कीडगंज येथील गोपाल मंदिर अर्ध विकल्याचा आरोप त्यांनी केला होता. मठ आणि मंदिराच्या विकलेल्या जमिनी विकून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचबरोबर हनुमान मंदिरात येणार्या लाखो रुपयांची देणगी आणि बेहिशोबी उत्पन्नाची चौकशीची मागणी केली होती. यानंतर बराच वाद झाला होता. त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला होता.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …