बेळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांची 105 वी जयंती 25 सप्टेंबर रोजी देशभर समर्पण दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष श्री. किरण जाधव यांनी शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार देऊन साजरा केला.
गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी प्रास्ताविक करून किरण जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. ’आपापसातील मतभेद दूर ठेवून आपण विकासाच्या दृष्टीने एकत्र येऊया’ असे सांगून किरण जाधव यांनी सिद्धार्थ बोर्डिंगच्या इमारत, गोशाळा व इतर समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बोर्डिंगचे अध्यक्ष संतोष होंगल यांनी स्वागत करून शाल व पुष्पगुच्छ अर्पण केले.
अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव गुरव यांनी फेटे बांधून, शाल अर्पण करून श्री. किरण जाधव आणि सहकारी यांचा सत्कार केला. याप्रसंगी किरण जाधव यांच्या कार्याचे कौतुक श्री. सुरेंद्र देसाई व अनंत लाड यांनी आपल्या भाषणात केले.
याप्रसंगी भाजपा मोर्चाचे पदाधिकारी गदेश नंदगडकर, चेतन नंदगडकर, राजन जाधव, अक्षय साळवी, शिवा मगन्नावर तसेच बोर्डिंगचे उपाध्यक्ष हिरालाल चव्हाण, संजय चौगुले, गोपाळराव सडेकर, शिवाजी पवार, पवित्रा हिरेमठ, रूपाताई सावंत, लक्ष्मीबाई कांबळे, रेणुका सूर्यवंशी, कविता कांबळे व इतर उपस्थित होते. श्री. होंगल यांनी आभार प्रदर्शन केले.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …