येळ्ळूर : येळ्ळूर (ता. बेळगाव) गावामध्ये सध्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. नऊ जणांचा जावा घेणार्या या धोकादायक कुत्र्याला पकडण्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर पिसाळलेल्या कुत्र्यामुळे येळ्ळूर गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. हे कुत्रे अचानक प्रकट होऊन अंगावर धावून जात असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना घराबाहेर सोडणे धोक्याचे झाले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत 9 जणांना चावा घेतला असल्यामुळे गावकर्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून सध्या गटागटाने संबंधित कुत्र्याचा शोध घेतला जात आहे. त्याचप्रमाणे येळ्ळूर गावातील तसेच आसपासच्या परिसरातील लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी. यदाकदाचित कुत्रा चावल्यास तात्काळ नजीकच्या सरकारी दवाखान्याची संपर्क साधून मोफत उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …