कुद्रेमानी : मराठी भाषा, संस्कृती जतन करून स्वाभिमानाने अस्मिता टिकविण्यासाठी गेली ६५ वर्ष सीमाबांधव सीमालढा लढतो आहे. मराठी भाषिकांना अल्पसंख्यांक आयोगाने हक्क देणे, मराठीत कागदपत्रे मिळावीत अशा विविध मागण्याकरिता हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन सीमाकवी रवी पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समिती कार्यकर्ते गावडू तानाप्पा पाटील होते.
यावेळी कुद्रेमानी म.ए. समितीच्यावतीने २५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट मोर्चा निघणार आहे तसेच १ नोव्हेंबर काळादिनाला बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी पाठिंबा जाहिर केला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ अप्पुणी गुरव, शांताराम बळवंत गुरव, महादेव यलाप्पा गुरव, मारुती शांताराम पाटील, एम. बी. गुरव, दिपक गा. पाटील, मनोज गुरव, मारुती मजुकर, नागेश बोकमूरकर, निशांत गुरव, अक्षय पावले, ओमकार गुरव उपस्थित होते.