मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न
बेळगाव : मी शिक्षक आहे म्हणजे इतरांपेक्षा कोणीतरी वेगळा आहे ही भावना शिक्षकांच्यात निर्माण झाली पाहिजे, शिक्षक असल्याची जबाबदारी घेतल्यानंतर त्या विषयाची बांधीलकी मानून त्याविषयीचे आपले ज्ञान वृद्धिंगत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.
बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय व वनिता विद्यालय यांच्यावतीने बेळगाव शहरातील मराठी शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी विषयक कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मराठी फोरमचे अध्यक्ष संजय नरेवाडकर, नोडल अधिकारी रेखा अष्टेकर, मराठी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक रणजीत चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिता विद्यालय शाळा मुख्याध्यापिका शालिनी हुदली या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींनी म्हटलेल्या स्वागतगीताने व नाडगीताने झाली. आश्लेषा मालेकर यांनी बायबल वाचन केले. रसिका खर्डेकर यांनी प्रार्थना म्हटली. संजय नरेवाडकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. श्रीमती शीतल देसाई यांनी पाहुण्यांची ओळख करून महेश कुंभार, बी. जी. पाटील, बी. एम. पाटील यांनी पुष्प देवून पाहुण्यांचे स्वागत केले. दुपारच्या सत्रात कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाविषयी तसेच परीक्षा पद्धती विषयी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता तोरगल यांनी केले. आरती कुप्पस्वामी यांनी आभार मानले. कार्यशाळेस मराठी विषयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …