मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईसह चौकशीचे आदेश
बेळगाव : सोंडूरचे काँग्रेस आमदार तुकाराम यांचा अवमान करणार्या तहसीलदार रश्मी यांच्याविरोधात तात्काळ कारवाई केली जावी. या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदारांनी आज विधानसभेत सभापतींच्या आसनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आमदार तुकाराम यांच्या अवमान करणार्या तहसीलदारांची तात्काळ बदली करून प्रकरणाची चौकशी केली जावी, असे आदेश दिले आहेत.
काँग्रेस आमदार तुकाराम यांचा अपमान करणार्या तहसीलदार रश्मी यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, सरकार वेळ काढत आहेत असा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात केला. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही ज्येष्ठ आमदारांविरोधात तहसीलदारांनी केलेली कृती निश्चितच संतापजनक आहे. त्यामुळे उद्धट वर्तन करणार्या तहसीलदारांवर तात्काळ कडक कारवाई केली जावी, अशी मागणी केली.
यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी सभापतींच्या आसनासमोर त्या तहसीलदारांच्या विरोधातील कारवाईसाठी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंत्री आर. अशोक यांनी तहसीलदार रश्मी यांचे तात्काळ बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …