बी. एस. येडियुराप्पा यांचा सरकारला घरचा आहेर
बेळगाव (वार्ता) : संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि मजूर हवालदिल झाले आहेत. अशावेळी प्रसंगी विकासकामांचा निधी रोखावा. शेतकरी आणि मजुरांना तात्काळ पैसे अदा करावेत, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बुधवारी विधान सभेत बोलताना व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात विधानसभेत अतिवृष्टीने झालेल्या हानी संदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी अतिवृष्टीने झालेल्या हानीमुळे, शेतकरी आणि मजूर हवालदिल झाले आहेत. शेतकर्यांना आणि मजुरांना सहाय्य धन मिळत नाही. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन सरकारने लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बोलताना बी. एस. येडियुराप्पा यांनी, आम. देशपांडे यांची पाठराखण करताना अतिवृष्टीने पिकांची मोठी हानी झाली आहे. अतिवृष्टीने झालेल्या आणि संदर्भात केंद्राला माहिती देण्यात आली आहे. केंद्राकडून निधी येण्याची वाट न पाहता अडचणीत असलेल्या शेतकरी आणि मजुरांना अन्य विकासकामांचा निधी रोखून, पैसे अदा करण्यात यावे अशी सूचना मांडली.
काँग्रेस नेते आमदार डी. के. शिवकुमार यांनी पिक विमा नावावर मोठा भ्रष्टाचार होत आहे. पिक विम्याच्या नावावर शेतकर्यांकडून पैसे भरून घेतले जातात. मात्र त्यांना भरपाई दिली जात नाही, अशी तक्रार मांडली. निधर्मी जनता दलाचे एच. डी. रेवण्णा, शिवलिंगेगौडा तसेच आमदार महांतेश कौजलगी यांनीही यावेळी आपली मते मांडली. आमदारांच्या प्रश्न आणि सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई उद्या उत्तर देणार आहेत.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …