बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन आणि न्यायालय आवार याठिकाणी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच न्यायालयीन इमारतींचे नूतनीकरण करून त्या सुसज्ज करण्यासाठी 2 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून यासंदर्भात उच्च न्यायालय बेंगलोरचे सरकारी निबंधक (पायाभूत सुविधा आणि देखभाल) यांना योग्य क्रम घेण्याबाबत सूचना केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. निवेदन सादर करते वेळी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी, कित्तुरचे आमदार महांतेश दोड्डगौडर आदी उपस्थित होते.
Check Also
बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू
Spread the love बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे …