सपाची कडवी झुंज, पण एकत्र न लढल्याचा फटका!
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडवी झुंज देऊनही भाजप सत्तेत वापसी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारी 12 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने उत्तर प्रदेशातील 403 जागापैंकी 273 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे समाजवादी पक्ष 119 जागांवर आघाडीवर आहे. मायावतींचा बसप 4 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे. इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत.
ज्या उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरीमध्ये शेतकर्यांना चिरडण्याची, तसेच हाथरस प्रकरण झाले त्या ठिकाणी सुद्धा भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. गोरखपूर मतदारसंघातून योगी आघाडीवर आहेत, तर कथरालमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत.