Tuesday , September 17 2024
Breaking News

महाराष्ट्रातील ‘त्या’ दाम्पत्याला मदत

Spread the love


बेळगाव : महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी रहात असलेले दाम्पत्य येथील बेळगाव शहरातील भेंडी बाजारमध्ये आढळले. यावेळी विजय निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी मानसी निंबाळकर यांनी या दोघांची विचारपूस केली आणि त्यांना मदत मिळावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर आणि अवधूत तुडयेकर यांना याबाबत माहिती दिली.
यावेळी त्यांनी सदर दाम्पत्यांना मदत मिळावी याकरिता घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडे गावी परतण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. याबाब त्यांनी पोलीस उपायुक्त रविंद्र काशिनाथ गडादी यांना याची माहिती दिली आणि पोलीस पथकाकडून या कुटुंबाची चौकशी त्यांना रेल्वेस्थानकावर पाठविण्यात आले.
त्यांना गावी परतण्यासाठी मिरज ट्रेन उपलब्ध नसल्याने त्यांची तात्पुरती रेल्वेस्थानकावर राहण्याची सोय करण्यात आली तसेच या ठिकाणी त्यांना जेवणाची सोय केल्याने त्यांनी त्यांच्या मदतीसाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले. सदर दाम्पत्य उद्या मिरज रेल्वेने आपल्या गावी परतणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *