Tuesday , September 17 2024
Breaking News

अभियंत्याकडून गाव, देश सुंदर बनवण्याचे काम

Spread the love
काडसिद्धेश्वर स्वामी : असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगच्या समुदाय भवनाचे भूमिपूजन
निपाणी (वार्ता) : कोणतेही बांधकाम पूर्ण करणे सोपे नसते. त्यामध्ये अनेक अडचणी असतात. त्या दूर करून बांधकाम पूर्ण होत असते. अभियंत्यांच्याजवळ हे कौशल्य असून त्यांच्या हातून गाव आणि देश सुंदर बनविले जाते, असे मत कनेरी मठातील काडसिद्धेश्वर स्वामी यांनी व्यक्त केले. येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगच्या समुदाय भवन भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी अजय माने यांनी स्वागत केले. अध्यक्ष काकासाहेब ऐनापुर यांनी, या समुदाय भवनासाठी १२ हजार फूट हजार स्क्वेअर फूट नगरपालिकेने जागा दिली आहे. या भवनासाठी ५२ लाखाचा खर्च अपेक्षित आहे वर्षभरात त्याचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. भवनासाठी दिवंगत अभियंते बी. आर. पाटील परिवारातर्फे११ लाखाची मदत राजेश पाटील यांनी जाहीर केले. तर या भवनाला बी. आर. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रारंभी काडसिद्धेश्वर स्वामी, प्राण लिंग स्वामी, खासदार अण्णासाहेब जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, प्रा. डॉ. अच्युत माने, सभापती राजू गुंदेशा, नगरसेविका सुजाता कदम,
असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब ऐनापुरे, उपाध्यक्ष आसिफ मुल्ला, सेक्रेटरी अमित रमणकट्टी, अनुप पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश खोत, धनंजय खराडे, विजयकुमार मेथे, अभिजीत जिरागे, तौसिफ बागवान, योगेश घाटगे, चंद्रशेखर हेगडे, नवीन बडाकर, आसिफ मुल्ला, नितीन जाधव, सी. डी. पाटील, सुनील बल्लोळ, भरत बेडकिहाळे, आनंद बानगर, काकसो मगदूम, अमर चौगले, विठ्ठल नलावडे, काका लोळसुरे, राजेंद्र पाटील, पद्मकांत शेंदुरे, योगेश आवटे, वीरेंद्र निंबाळकर, राजेंद्र पणदे, राजशेखर हिरेकोडी, अजित नरके, सुरेश रायमाने, दीपक माने, अजय माने, सुदेश बगाडी, सोमनाथ परमणे, महादैव पालकर, गजानन वासेदार, प्रशांत शहा, प्रमोद जाधव, श्रेयस मेहता, अनुप पाटील, धनंजय खराडे, चंद्रकांत पाटील, रवींद्र कदम, आर. के. धनगर, रवी गुळगुळे, सुनील शेवाळे, महेश पाटील, प्रशांत रामनकट्टी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *