Tuesday , September 17 2024
Breaking News

जीवनातील यशासाठी निरंतर कार्यरत रहा

Spread the love

एस. एस. चौगुले : मराठा मंडळमध्ये सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्याच्यात परीश्रम, चिकाटी बालवयातच रूजली की निश्चित ध्येय गाठता येते. माध्यमिक स्तरावरच सतत अभ्यासाचा सराव करून निश्चितच ध्येय गाठता येते. विद्यार्थ्यांनी लक्ष, ध्येय ठरवून ते प्राप्त करण्यासाठी निरंतर कार्यरत राहिले पाहिजे, असे मत कुरली येथील रयत शिक्षण संस्थेचे सिद्धेश्वर हायस्कूलचे विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांनी व्यक्त केले.
येथील निपाणी मराठा मंडळ संचलित निपाणी मराठा मंडळ हायस्कूल येथील इयत्ता दहावी विद्यार्थ्यासाठी सदिच्छा समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिध्देश्वर विद्यालय कुर्लीचे एस. एस. चौगले बोलत होते. अध्यक्ष्यस्थानी शैक्षणिक समितीचे अध्यक्ष राजेश कदम होते.
सुरुवातीला मराठा मंडळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत माजी आमदार रघुनाथराव कदम (दादा) यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक पी. एम. सुतार यांनी करून दिला.
गेल्या दहावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांची मनोगते झाली. राजेश कदम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास रणजित देसाई, प्राचार्य एस. आर. कुलकर्णी, एन. टी. खराडे. जे. आर. खपले, एस. ई. साखळकर, व्ही. व्ही. पत्की, एस. बी. पाटील, के. एल. कांबळे, अनिल यादव, प्रदीप सातवेकर, मुकुंद कोरे उपस्थित होते. सेजल सुतार हिने सूत्रसंचालन केले. प्रभाळकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *