बेळगाव : सोलापूर येथे संपन्न झालेल्या समारंभात बेळगावचे युवा संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना ‘पंडीत चिदानंद जाधव युवा गंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रुपये अकरा हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक भीमण्णा जाधव, डॉ. श्रीकांत येळेगावकर, छाया बैजल, युवा कलावंत ऋषिकेश नागावकर, पत्रकार शिवाजी सुरवसे हे उपस्थित होते.
यावेळी आयोजित केलेल्या प्रतिभा संगीत महोत्सवात सारंग यांनी राग देस आणि मराठीअभंग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यांना पंडीत आनंद बदामीकर यांनी तबला साथ केली.