पडलिहाळ येथे रयत संघटना शाखा उद्घाटन
निपाणी (वार्ता) : जगाचा पोशिंदा हा शेतकरी असून या शेतकऱ्याच्या वर कोणता ही अन्याय, अत्याचार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून
शेतकऱ्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यास सक्षम
आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
ते पडलिहाळ येते कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेनेच्या 37 व्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. मधुकर पाटील होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पडलिहाळ येथील नूतन रयत संघटनेतील अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी कार्याध्यक्ष सदस्य व पदाधिकारी यांचा हिरवी शाल घालून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राजू पोवार म्हणाले, कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वज्रमूठ बांधून त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी संघटना नेहमी कार्यतत्पर राहणार असून त्यांच्यासाठी नेहमी रस्त्यावर उतरणार तयारी असल्याचे सांगितले,
या प्रसंगी निपाणी युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, निपाणी तालुका अध्यक्ष आय. एन. बेग, शहराध्यक्ष उमेश भारमल, रमेश पाटील, अशोक तोडकर, तानाजी पाटील यांनी रयत संघटनेचे कार्य व कार्यप्रणाली विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास निपाणी सहपरिसरातील रयत संघटनेचे शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, याच्यासह पडलिहाळ पिकेपीएस चेअरमन संजय स्वामी, पडलीहाळ शाखा अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सेक्रेटरी सचिन पाटील, कार्याध्यक्ष सागर जाधव, शंकर शिंत्रे, प्रकाश सासणे, आनंदा मोरे, दिनकर पाटील, रणजीत जाधव, दीपक चिमगावे, मधुकर पाटील, शरद पाटील, विनायक भोसले, युवराज पाटील, मारुती शिंदे, उमेश शिंदे, योगेश कांबळे, प्रदीप कांबळे, यांच्यासह पडलीहाळ येथील शेतकरी वर्ग नागरिक उपस्थित होते.