बेळगाव : श्री दुर्गा सेवा संघटना बेळगाव यांच्यावतीने बेळगावच्या भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे या किल्ल्याला आता चांगले भवितव्य मिळणार आहे. बेळगाव परिसरातील अनेक शिवभक्त या संघटनेमध्ये सामील असून या संघटनेच्या वतीने अनेक किल्ल्यावर हे अभियान यापूर्वी राबविण्यात आले आहे. आता या किल्ल्यावरील झाडेझुडपे, अनेक वेली भिंतीवर वाढलेल्या आहेत, हे सर्व कापण्याचे कार्य आता करण्यात येत आहेत, तसेच योग्य त्या ठिकाणी कार्य करून अनेक भिंती वरील पडत असलेले दगड त्या ठिकाणी बसून गड संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगावचा किल्ल्याचे इतिहास फार मोठा आहे, जैन राजा रट्ट घराण्याची अनेक वर्षे या किल्ल्यावर सत्ता होती, ऐतिहासिक 108 बस्ती पैकी केवळ कमल बस्ती आहे. कालांतराने मोंगल, मराठे, इंग्रजांनी या किल्ल्यावर राज्य केले आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या किल्ल्याचा पर्यटनाच्या धर्तीवर विकास झाला पाहिजे, आज राजस्थानसारख्या राज्यात अनेक गड किल्ले येथील प्रशासनाने पर्यटनाच्या धर्तीवर संवर्धन करून पर्यटनाला फार मोठी चालना मिळाली आहे. परंतु शासनाची उदासीनता दिसून येत असल्यामुळे या दुर्गा सेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या किल्ल्याचा विकास करून त्याला सुरक्षित ठेवण्याचा विडा उचलला आहे. या हितूने या संघटनेचे कार्यकर्ते दर रविवारी या किल्ल्यावर येऊन हे अभियान राबवत आहेत. दुर्गा सेवा संघटनेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाला बेळगाव परिसरातील शिवभक्तानी त्यांचे कौतिक केले आहे. तसेच शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या किल्ल्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून हे एक पर्यटन स्थळ करावे, अशी मागणी बेळगाव नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …